Ira Khan-Nupur Shikharee Wedding : आमिर खानच्या लेकीचा महाराष्ट्रीयन पद्धतीने पार पडणार लग्नसोहळा, या ठिकाणी होणार रिसेप्शन

Published : Dec 29, 2023, 02:59 PM ISTUpdated : Dec 29, 2023, 03:10 PM IST
Ira Khan Wedding

सार

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान हीचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. आयरा येत्या 3 जानेवारीला (2024) पार्टनर नुपूर शिखरे याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे.

Aamir Khan Daughter Wedding : आमिर खान आणि रीना दत्त (Reena Dutt) यांची मुलगी आयरा खान (Ira Khan) येत्या 3 जानेवारी (2024) आपला पार्टनर आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे (Nupur Shikhare) याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. आयरा आणि नुपूरचा महाराष्ट्रीयन पद्धतीने विवाह सोहळा पार पडणार आहे. अशातच आता या दोघांच्या लग्नाबद्दल एक अपडेट समोर आली आहे.

रिपोर्टनुसार, आयरा आणि नुपूर लग्नानंतर दोन वेडिंग रिसेप्शन देणार आहेत. हे रिसेप्शन दिल्ली आणि जयपूरमध्ये होणार आहेत. सध्या आमिरच्या घरी लेकीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.

आयरा-नुपूरचे प्री-वेडिंग फंक्शन
काही दिवसांपूर्वी आयरा खानने आपल्या सोशल मीडियातील अकाउंटवर लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शनचे फोटो शेअर केले होतो. या फोटोंमध्ये आमिर खानची दुसरी पत्नी किरण राव आणि मुलगा आझादही दिसून येत आहे.

मुंबईत होणार लग्न
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा विवाह येत्या 3 जानेवारीला (2023) महाराष्ट्रीयन पद्धतीने होणार आहे. सूत्रांनुसार, खान परिवार आयराच्या लग्नामुळे अत्यंत आनंदित आहेत. आयरा आणि नुपूरचा लग्न सोहळा वांद्रे येथील ताज लँन्ड अ‍ॅण्ड हॉटेलमध्ये पार पडणार आहे. लग्नानंतर जानेवारी 6 ते 10 जानेवारी महिन्यादरम्यान दोन रिसेप्शन ठेवण्यात आले आहेत. यामधील एक रिसेप्शन हे दिल्लीत तर दुसरे जयपूरला होणार आहे.

आमिर लेकीच्या लग्नासाठी उत्सुक
आमिर खान आपली लेक आयरा खान हीच्या लग्नासाठी फार उत्सुक आहे. आयरच्या लग्न सोहळ्याला आमिरची बी-टाउनमधील काही खास मित्रमंडळी उपस्थितीत राहू शकतात. यासाठी आमिर खान स्वत:हून निमंत्रण देत आहे.

नुपूर शिखरे हा फिटनेस ट्रेनर आहे. नुपूर आणि आयराने गेल्या वर्षात (2022) इटलीमध्ये साखरपुडा केला होता. त्याच्या दोन महिन्यानंतर साखरपुड्याची पार्टीही ठेवण्यात आली होती. यावेळी काही बॉलिवूड कलाकार, खास मित्रपरिवार उपस्थितीत होते.

आणखी वाचा:

Bollywood : ईशा कोप्पीकर पती टिमी नारंगपासून लग्नाच्या 14 वर्षानंतर विभक्त, घटस्फोटाबद्दल अभिनेत्री म्हणाली....

Ranbir Kapoor Viral Video : रणबीर कपूर अडकला वादाच्या भोवऱ्यात, धार्मिक भावना दुखावल्याने पोलिसात तक्रार दाखल

Happy Birthday Salman Khan : सलमान खानने भाचीसोबत साजरा केला वाढदिवस, बॉबी देओलची खास उपस्थिती (Watch Video)

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!