गणेशोत्सवावेळी इको फ्रेंडली गणपतीची स्थापना करा, सलमान खानचे नागरिकांना आवाहन

Ganesh Chaturthi 2024 : येत्या 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाचा सण सुरु होणार आहे. अशातच सलमान खानने एका कार्यक्रमावेळी नागरिकांना इको फ्रेंडली गणपती आणण्याचे आवाहन केले आहे. यासह पीओपीपासून तयार केल्या जाणाऱ्या गणपतींबद्दलही सलमान खानने वक्तव्य केलेय.

Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाचा सण संपूर्ण देशभरात मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. मुंबईसह कोकणात गणेशोत्सवाची धूम पहायला मिळते. याशिवाय बॉलिवूड ते सामान्य नागरिक घरी गणपतीची स्थापना करत भक्तिभावाने पूजा-प्रार्थना करतात. यानंतर गणपतीचे विसर्जन केले जाते. बॉलिवूडमधील अनेक कलाकरांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन होते. सलमान खानच्या घरी देखील गणपतीची स्थापना केली जाते. अशातच यंदाच्या गणेशोत्सवाआधी सलमान खानने नागरिकांना घरी गणपती आणण्याबद्दल खास आवाहन केले आहे.

इको फ्रेंडली गणपती घरी आणा
मुंबईत एका कार्यक्रमावेळी सलमान खानने चाहत्यांना आणि नागरिकांना गणेशोत्सवावेळी इको फ्रेंडली गणपती आणण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय इको फ्रेंडली गणपती घरी आणल्यास काय होईल याबद्दलचे वक्तव्य सलमान खानने केले आहे. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये सलमान खान म्हणतोय की, पीओपीमधील गणपतींचे विसर्जन केल्यानंतर त्यांची प्रतिमा अस्थावस्थ पडलेली पाहणे खूप वाईट वाटते. याशिवाय अर्धवट तुडलेली गणपतीची मुर्ती समुद्राच्या येथे पाहणे चांगले वाटते का? गणपतीचे एका बाजूला तुटलेला हात, पोट समुद्रात विसर्जनानंतर दिसते. त्यावरच आपला पाय लागला जातो. ही उत्तम बाब नाही. यामुळे सर्वांनी इको फ्रेंडली गणपती घरी आणा असे आवाहन सलमानने केले आहे.

सलमानच्या घरातील गणपती
सलमान खान म्हणतो माझ्या घरी मी गणपतीची पूजा करतो. गणेशोत्सवावेळी स्थापन केल्या जाणाऱ्या गणपतीची मुर्ती इको फ्रेंडली असते. गणपतीचा सण एवढा शुद्ध आहे तर गणपतीची मुर्ती का नाही?

दरम्यान, मुंबईतील इवेंटमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी स्टेजवर दिसून येत आहेत. याशिवाय सोनाली बेंद्रेही कार्यक्रमासाठी आली होती. सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास सध्या तो 'सिकंदर' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा वर्ष 2025 मध्ये ईदच्या मोक्यावर रिलीज होणार आहे. सिनेमात सलमान खानसह सुनी शेट्टी, रश्मिका मंदनाही झळकणार आहे.

आणखी वाचा : 

Bigg Boss 18 सीजनसाठी या 8 जणांनी दिला नकार, निर्माते पडले अडचणीत

कंगना राणौतकडून बॉलिवूडमधील काळ्या बाजूची पोलखोल, म्हणते इंडस्ट्रीत टॅलेंटला…

Read more Articles on
Share this article