मल्याळम नव्हे बॉलिवूडमधील या 5 कलाकारांवरही लागलेत लैंगिक अत्याचाराचे आरोप

मल्याळम इंडस्ट्रीमध्ये सध्या मोठी खळबळ उडाली आहे. काही अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता आणि दिग्दर्शकांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. हाच प्रकार MeToo वेळी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये उघड झाला होता.

Entertainment : फिल्म इंडस्ट्री कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असते. सध्या मल्याळम सिनेसृष्टीतील काही कलाकारांवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. हेमा कमेटीचा रिपोर्ट (Hema Committee Report) समोर आल्यानंतर मल्याळम सिनेसृष्टीतील महिलांना कास्टिंग काउच आणि लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागत असल्याचे धक्कादायक खुलासे झाले आहेत. या प्रकरणात काही मोठी नावे समोर आली आहेत. यामध्ये बडे निर्माते ते दिग्दर्शकांचा देखील समावेश आहे.

पहिल्यांदाच असे होत नाहीये की, एखाद्या अभिनेत्याचे नाव लैंगिक अत्याचारामध्ये समोर आले आहे. वर्ष 2017 मध्ये अमेरिकेत व्हायरल झालेल्या MeToo कॅम्पेनचा प्रभाव भारतातही दिसून आला. यामध्ये वर्ष 2018 मध्ये बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी फिल्म इ़ंडस्ट्रीमधील काहीजणांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते.

नाना पाटेकर
बॉलिवूडमधील दिग्गद अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘क्रांतिवीर’, ‘तिरंगा’, वे'लकम', ’काला', ‘अब तक छप्पन’ आणि ‘नटसम्राट’ अशा सिनेमांमध्ये काम केले आहे. 25 डिसेंबर वर्ष 2018 मध्ये मीटू कॅम्पेनवेळी एका मुलाखतीत वर्ष 2004 ची मिस इंडिया युनिव्हर्स राहिलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होत. वर्ष 2008 मध्ये आलेल्या हॉर्न ओके प्लीज सिनेमावेळी माझ्यासोबत नाना पाटेकर यांनी गैरवर्तवणूक केल्याचा आरोप लावला होता. पण नाना पाटेकर यांनी त्यांच्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट केले होते.

आलोक नाथ
बॉलिवूमधील दिग्गज अभिनेते आलोक नाथ यांनी ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ-साथ है’, ‘जीत’ अशा काही सिनेमांसाठी काम केले होते. आलोक नाथ यांच्यावरही लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते. लेखिका आणि निर्माती विंता नंदा, अभिनेत्री संध्या मृदुल, अभिनेत्री दीपिका अमीनसह अन्य एका महिलेने आलोक नाथ यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावल्यानंतर त्यांनी माझी प्रतिमा मलिल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले होते.

साजिद खान
दिग्दर्शक आणि कोरियोग्राफर फराह खानचा भाऊ दिग्दर्शक साजिद खानवरही लैंगिक अत्याचाराचे आरोप लावण्यात आले होते. साजिद यांनी आतापर्यंत तीन महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यामध्ये एक पत्रकार आणि दोन अभिनेत्रींचा समावेश आहे. पण साजिद यांनी आपल्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले होते.

कैलाश खेर
गायक आणि म्युझिक कंपोजर कैलाश खैर यांनी भारतातील वेगवेगळ्या भाषांमध्ये अनेक गाणी गायली आहेत. याशिवाय चार फिल्मफेअर पुरस्काराचे मानकरी देखील आहेत. कैलाश खेर यांच्यावर महिला फोटो जर्नलिस्ट नताशा होमरजानीसह गायिका सोना मोहापात्रानेही कैलाश यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला होता.

रजत कपूर
मीटू कॅम्पेनवेळी बॉलिवूडमधील अभिनेता रजत कपूरचे नाव समोर आले होते. एका महिला पत्रकाराने रजत कपूरवर आरोप लावल होता की, टेलीफोनिक मुलाखतीवेळी रजतने मला वाईट शब्दात काही गोष्टी बोलल्या होत्या. या आरोपानंतर रजत कपूरने स्पष्टीकरण देत माफी मागितली होती.

आणखी वाचा : 

Ranveer Singh व्यतिरिक्त या बॉलिवूड कलाकारांनीही सोडली होती नोकरी

वयाच्या 59 व्या लग्न करणार? आमिर खान म्हणतो...

Share this article