रामानंद सागर यांची 'Ramayan' मालिका पुन्हा होणार प्रसारीत, DD National ने जाहीर केली तारीख आणि वेळ

रामानंद सागर यांची लोकप्रिय मालिका ‘रामायण’ पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर प्रदर्शित केली जाणार आहे. या संदर्भातील एक पोस्ट दूरदर्शनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.

Chanda Mandavkar | Published : Feb 3, 2024 12:52 PM IST / Updated: Feb 03 2024, 06:27 PM IST

Ramayan on DD National Time and Date : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक प्रसिद्ध आणि घराघरांमध्ये पोहोचलेली रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका पुन्हा एकदा प्रसारीत केली जाणार आहे. 90 च्या दशकातील सर्वांनी 'रामायण' मालिका पाहिली असेल. दूरदर्शनवर प्रसारीत केल्या जाणाऱ्या 'रामायण' मालिकेला आजही प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. अशातच 'रामायण' मालिका कधी प्रसारीत केली जाणार आणि कोणत्या वेळी याबद्दलची माहिती दूरदर्शनने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर दिली आहे.

रामायण मालिकेची वेळ आणि तारीख
प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका 'रामायण' संदर्भात दूरदर्शनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे की, धर्म, प्रेम आणि समर्पणाची अनोखी गाथा पुन्हा एकदा येत आहे. संपूर्ण भारतातील लोकप्रिय मालिका येत्या 5 फेब्रुवारीपासून दररोज संध्याकाळी 6 वाजता प्रसारीत होणार आहे. या मालिकेचे पुन: प्रक्षेपण दुपारी 12 वाजता केले जाणार आहे.

रामायण मालिकेमधील स्टारकास्ट
'रामायण' मालिकेतील स्टारकास्टबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये अरुण गोविल यांनी प्रभू श्रीराम, दीपिका चिखलिया यांनी देवी सीता आणि सुनील लहरी यांनी लक्ष्मण यांची भुमिका साकारली होती. 'रामायण' मालिका सर्वप्रथम वर्ष 1987 रोजी दूरदर्शवन सुरू झाली होती. मालिकेतील प्रत्येक पात्राने आजही प्रेक्षकांच्या मनावर आपल्या भुमिकेचा ठसा उमटवला आहे. ऐवढेच नव्हे अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया म्हणजेच राम-सीता यांना आजही नागरिक देवाच्या रुपात पाहतात.

लॉकडाऊनमध्ये रामायण मालिका पुन्हा दाखवण्यात आली होती
22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. यावेळी 'रामायण' मालिकेतील राम-सीता आणि लक्ष्मण यांची भुमिका साकारणाऱ्या कलाकारांनी प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. राम मंदिरातील रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर पुन्हा एकदा 'रामायण' मालिका दाखवण्याची मागणी प्रेक्षकांनी केली होती. अशातच आता दूरदर्शनवर पुन्हा एकदा मालिका दाखवली जाणार आहे. दरम्यान, याआधी कोरोना महामारीच्या वेळी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन वेळी 'रामायण' मालिका पुन्हा प्रसारीत करण्यात आली होती.

आणखी वाचा : 

देशातील या सिनेमांचे बजेट अंतरिम अर्थसंकल्पापेक्षाही अधिक, जाणून घ्या

Shaitaan Teaser Out : "एक खेल है खेलोगे? इस खेल का बस एक नियम है", अजय देवगणाच्या 'शैतान' सिनेमाचा टीझर प्रदर्शित

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी या दिग्गजांनी लावली उपस्थिती, पाहा Photos

Share this article