Poonam Pandey च्या मृत्यूच्या बातम्यांना पूर्णविराम, अभिनेत्रीने जिवंत असल्याची माहिती दिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिल्यात अशा प्रतिक्रिया

Published : Feb 03, 2024, 03:02 PM ISTUpdated : Feb 03, 2024, 04:37 PM IST
Poonam Pandey

सार

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या इंस्टाग्रावरुन तिच्या मृत्यूची पोस्ट शेअर करण्यात आली होती. अशातच आता पूनमने ‘मी जिवंत’ असल्याची माहिती देत एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओवरवरुन पूनमला नेटकरी चांगलेच सुनावत आहेत.

Poonam Pandey Alive : मॉडेल पूनम पांडेच्या निधनाच्या बातम्यांनी कालपासून जोर धरला होता. कोणालाही पूनमच्या निधनाबद्दल खरं वाटत नव्हते. प्रत्येकजण हा एक पब्लिक स्टंट आहे असाच प्रश्न उपस्थितीत करत होता. याशिवाय पूनमच्या अधिकृत इंस्टाग्रामवरुन शेअर करण्यात आलेल्या पोस्टखाली देखील असंख्य प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या. अशातच आज (2 फेब्रुवारी) पूनमने तिच्या अधिकृत इंस्टाग्रावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

पूनमने शेअर केला व्हिडीओ
पूनम पांडेने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पूनमने म्हटले की, ‘मी जिवंत आहे. माझा गर्भाशयाच्या कॅन्सरने (Cervical Cancer) मृत्यू झालेला नाही. दुर्दैवाने मी अशा हजारो महिलांबद्दल बोलू शकत नाही ज्यांनी गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे आपला जीव गमावला आहे." अशा आशयाची एक भली मोठी पोस्ट पूनमने शेअर केली आहे. पोस्टच्या अखेरीस पूनमने #DeathToCervicalCancer असा हॅशटॅग वापरला आहे.

पूनमवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत दिल्या अशा प्रतिक्रिया
पूनमने स्वत: व्हिडीओ शेअर करत मी जिवंत असल्याची माहिती दिल्याने नेटकऱ्यांनी तिच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. याशिवाय अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओखाली आता तिला चांगलेच सुनावले जातेय.

एका युजरने प्रतिक्रिया देत म्हटले की, “पुढच्या वेळेल नागरिक तुला गांभीर्याने घेणार नाहीत. तुझ्यावरचा विश्वासच उडाला आहे.” दुसऱ्याने म्हटले, सर्वाधिक “वाईट पब्लिसिटी स्टंट आहे.” तिसऱ्याने म्हटले की, “एखाद्या गोष्टीचा प्रचार करण्याचा हा सर्वात वाईट मार्ग होता...” अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया पूनमच्या व्हिडीओखाली नेटकऱ्यांकडून दिल्या जात आहेत. 

आणखी वाचा : 

Poonam Pandey च्या मृत्यूच्या बातम्यांदरम्यान KRKने शेअर केला अभिनेत्रीचा पार्टी करतानाचा व्हिडीओ, रोजलिन खान म्हणाली.....

Poonam Pandey : अवघ्या 12 दिवसात मोडला होता पूनम पांडेचा विवाह

शोएब मलिकची पत्नी सना जावेदच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप, दिल्या अशा प्रतिक्रिया

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!