Ram Mandir Ceremony : अक्षय-माधुरीसह या कलाकारांनाही निमंत्रण, यादी आली समोर

Published : Dec 15, 2023, 06:10 PM ISTUpdated : Dec 15, 2023, 10:22 PM IST
Madhuri Dixit

सार

Ram Mandir Opening Ceremony: अयोध्येत श्रीराम मंदिराच्या शुभारंभासाठी बॉलिवूड ते साउथ सिनेसृष्टीतील कलाकारांना आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये अक्षय कुमार, रजनीकांत, अमिताभ बच्चन, चिरंजीवी यांच्यासह अन्य कलाकारांची नावे आहेत.

Ram Mandir Ceremony :अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरदार सुरू झाली आहे. रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारी (2024) रोजी पार पडणार आहे. या भव्य कार्यक्रमासाठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार उपस्थितीती लावणार आहेत. Pinkvilla या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, कार्यक्रमासाठी बॉलिवूड (Bollywood) आणि साऊथ (South) सिनेसृष्टीतील  कोणते कलाकार उपस्थिती लावणार आहेत याची लिस्ट समोर आली आहे.

हे प्रसिद्ध कलाकार राहणार उपस्थितीत
Pinkvillaच्या रिपोर्ट्सनुसार उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, अक्षय कुमार, प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी, संजय लीला भन्साळी, रोहित शेट्टी आणि निर्माते महावीर जैन उपस्थितीत राहतील. याशिवाय साऊथ सुपरस्टार रजनीकांत, चिरंजीवी, मोहनलाल, धनुष आणि ऋषभ शेट्टीसह अन्य सेलेब्सला देखील कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे.

राम मंदिर उद्घाटनातील महत्त्वाच्या गोष्टी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम मंदिरचे बांधकाम यंदाच्या वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तर राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी, 2024 रोजी केले जाईल.

  • मंदिर परिसरात रामलला यांची मूर्ती स्थापन केली जाईल.
  • या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थितीत असणार आहे.
  • अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनावेळी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात केली जाणार आहे
  • मंदिर परिसरात प्रवेश करणाऱ्या भाविकांना 320 फूट दूर अंतरावरून रामलला यांचे दर्शन घेण्याची परवानगी असणार आहे.
  • दर्शन-पूजेनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाणार आहे.

खास दिवशी प्रसादाचे होणार वाटप
रिपोर्ट्सनुसार, एका खास दिवशी मंदिरासह सर्वत्र प्रसाद वाटपाची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय उद्घाटनादरम्यान रामलला यांची सेवा-पूजा सध्याचे पुजारीच करतील. दरम्यान, मंदिराचे बांधकाम 5 ऑगस्ट, 2020 पासून सुरू करण्यात आले होते.

आणखी वाचा: 

Ayodhya Ground Report : अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी उभारली Tent City, जाणून घ्या खास गोष्टी

दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला आग, महिला जखमी

Bollywood Update : दबंग सलमान खानच्या हिरोईनला जीवे मारण्याची धमकी? नेमके काय आहे सत्य

PREV

Recommended Stories

अक्षय खन्नाचा बॉक्स ऑफिसवरचा जलवा! करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारे 'हे' ५ चित्रपट कोणते? पाहा यादी!
Dhurandhar Banned : 300 कोटी कमावणारा धुरंधर पाकिस्तानमध्ये नव्हे तर या 6 देशांमध्ये का झाला बॅन?