प्रियांका चोप्रानं एस. एस. राजामौलींच्या सिनेमासाठी किती घेतलं मानधन, आकडा वाचून म्हणाल छप्पर फाडके मिला

Published : Nov 16, 2025, 08:18 AM IST

हॉलिवूडमध्ये व्यस्त असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता एस. एस. राजामौली दिग्दर्शित चित्रपटातून भारतीय सिनेसृष्टीत पुनरागमन करत आहे. या चित्रपटात ती मंदाकिनीच्या भूमिकेत दिसणार आहे.

PREV
16
प्रियांका चोप्रानं एस. एस. राजामौलींच्या सिनेमासाठी किती घेतलं मानधन, आकडा वाचून म्हणाल छप्पर फाडके मिला

गेल्या काही वर्षांपासून प्रियांका चोप्रा ही अभिनेत्री हॉलिवूडमध्ये रमली आहे. आता परत ती एका चित्रपटात काम करणार असल्याची माहिती समजली आहे. प्रियांका चोप्रा ग्लोबट्रॉटर या चित्रपटात दिसून येणार आहे.

26
काय म्हणाली प्रियांका?

'हा सिनेमा माझ्यासाठी नवं पर्व ठरेल अशी आशा आहे. तसंच भारतीय सिनेमातलं माझं होत असलेलं पुनरागमन रंजक असेल, असं वाटतं', अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

36
चित्रपटाच्या पहिल्या लूकने चाहत्यांना टाकलं भारावून

एस. एस. राजामौली दिग्दर्शित चित्रपटात प्रियांका चोप्रा ही मंदाकिनी या दमदार भूमिकेतून दिसून येणार आहे. कत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये ती पिवळ्या साडीत, पारंपरिक कोल्हापुरी चप्पल घातलेली आणि हातात बंदूक धरून गंभीर मुद्रेत दिसते.

46
प्रियांका हॉलिवूडमध्ये होती व्यस्त

काही वर्षांपासून प्रियांका ही हॉलिवूडमध्ये व्यस्त असल्याचं दिसून आलं आहे. ती काही काळ चित्रपटापासून गायब झाल्याचं दिसून आलं आहे. राजमौली यांचा हा सिनेमा प्रियांकासाठी एक नव पर्व ठरणार आहे.

56
किती घेतलं मानधन?

प्रियंकाने या चित्रपटासाठी मोठं मानधन घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. तिने जवळपास ३ कोटींचं मानधन घेतलं आहे. हे मानधन बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्याच्या तोडीचं असतं.

66
सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत टॉपवर

सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत प्रियांका चोप्रा ही टॉपवर जाऊन पोहचली आहे. प्रियंकाने मुंबईत आल्यानंतर सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलं आहे.

Read more Photos on

Recommended Stories