काजोल आणि ट्विंकल दोघींनी 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला केलं डेट, नाव वाचून म्हणाल अस्सल नंबरी सोनं

Published : Nov 15, 2025, 02:00 PM IST

‘टू मच विथ काजोल आणि ट्विंकल’ या शोमध्ये विकी कौशल आणि क्रिती सॅनॉन यांनी हजेरी लावली. यावेळी, ट्विंकल खन्नाने एक मोठा खुलासा केला की तिचा आणि काजोलचा एक कॉमन एक्स-बॉयफ्रेंड होता. या खुलाशानंतर चाहते आता त्या व्यक्तीबद्दल अंदाज लावत आहेत.

PREV
15
काजोल आणि ट्विंकल दोघींनी 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला केलं डेट, नाव वाचून म्हणाल अस्सल नंबरी सोनं

टू मच विथ काजोल आणि ट्विंकल हा शो मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होताना दिसत आहे. या शोमध्ये वेगवेगळे सेलिब्रेटी येऊन वैयक्तिक आणि व्यावसायिक मुद्यांवर चर्चा करत असल्याचं दिसून येत आहे.

25
शोच्या नवीन भागात कोण उपस्थित होतं?

शोच्या नवीन भागामध्ये विकी कौशल आणि क्रिती सॅनॉन हे दोघे आले होते. या दोघांच्या उपस्थितीत नवीन शो पार पडला असून या चारही सेलिब्रेटींनी यावेळी धम्माल मस्ती केली.

35
नेमकं काय झालं?

यावेळी टू मच काजोल अँड ट्विंकलच्या एपिसोडमध्ये होस्ट ट्विंकलने तिचा भूतकाळ उघड केला आहे. तिला यावेळी विचारण्यात आलं की बेस्ट फ्रेंड्सने एकमेकांच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट करावे का?

45
ट्विंकल खन्नाला मित्र महत्वाचे

यावेळी बोलताना ट्विंकल खन्नाने म्हटलं आहे की, माझे मित्र मला बाकी सर्वांपेक्षा महत्वाचे आहेत. प्रियकर तुम्हाला कोठेही मिळेल. त्यानंतर तिने काजोलकडे पाहिलं आणि आमचा एक कॉमन एक्स बॉयफ्रेंड होता असं म्हटलं आहे.

55
चाहत्यांनी काय लावला अंदाज

यावेळी चाहत्यांनी अंदाज लावला आहे. चाहत्यांनी अभिषेक कपूर आणि बॉबी देओल यांच्या नावाचा अंदाज वर्तवला आहे. आता अजून कोणाच्या नावाची भर पडते ते लवकरच समजेल.

Read more Photos on

Recommended Stories