गोविंदाने पत्नी सुनीताला 'मंगळसूत्रासारखा' हार केला गिफ्ट, घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना असं काय झालं की...

Published : Oct 10, 2025, 07:34 PM IST

गोविंदा आणि सुनीता आहुजा: अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा सोशल मीडियावर सक्रिय असून त्यांनी करवा चौथ साजरा केला आहे. गोविंदाने करवा चौथनिमित्त दिलेल्या खास गिफ्टचा फोटो शेअर करत सुनीताने एक खास कॅप्शन दिले आहे.

PREV
16
गोविंदाने पत्नी सुनीताला मंगळसूत्रासारखा हार केला गिफ्ट, घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना असं काय झालं की...

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा त्या त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल सोशल मीडियावरून माहिती देत असतात. आता त्यांनी सोशल मीडियावरून एक माहिती दिली आहे.

26
करवा चौथनिमित्त दोघांना पाहण्यात आलं

करवा चौथनिमित्त बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी कपल हा सण साजरा करताना दिसत आहेत. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांनीसुद्धा हा सण साजरा केल्याचं दिसून आलं.

36
करवा चौथनिमित्त गोविंदाने काय गिफ्ट दिलं?

सुनीता यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून गोविंदाने तिला करवा चौथनिमित्त भेटवस्तू दिल्याचं तिने सांगितलं आहे. सुनीता यांनी हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

46
या फोटोला काय कॅप्शन दिलं?

या फोटोला सुनीताने सोना कितना सोना है, माझं करवा चौथचं गिफ्ट अशी कॅप्शन दिली असून गोविंदालाही टॅग केलं आहे. सुनीताच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर कमेंट केल्या आहेत.

56
कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ करत असतात शेअर

कुटुंबासोबत अनेकदा सुनीता या फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. अनेकदा त्या त्यांच्या पतीबद्दल स्पष्ट बोलत असतात. या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या अनेकदा अफवा पसरल्या होत्या.

66
गणेश चतुर्थीला एकत्र येत घटस्फोटाच्या चर्चा झाल्या बंद

गणेश चतुर्थीला दोघांनी एकत्र येत घटस्फोटाच्या चर्चा पूर्ण बंद केल्या होत्या. सुनीता यांचं स्वतःच युट्युब चॅनल असून त्या त्यावरून व्हिडीओ पोस्ट करत असतात. त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींबद्दल सांगत असतात.

Read more Photos on

Recommended Stories