Snake Venom Case : सापांसाठी वर्च्युअल क्रमांकावरून कॉल करायचा एल्विश यादव, पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमधून धक्कादायक खुलासे

रेव्ह पार्टीसाठी सापांचे विष पुरवल्याप्रकरणात एल्विश यादवसह आठ जणांच्या विरोधात नोएडा पोलिसांनी 1200 पानांची चार्जशीट दाखल केले आहे. याशिवाय चार्जशीटमधून काही धक्कादायक खुलासेही झाले आहेत.

Chanda Mandavkar | Published : Apr 9, 2024 8:11 AM IST / Updated: Apr 09 2024, 03:05 PM IST

Elvish Yadav Snake Venom Case :  रेव्ह पार्टीचे आयोजन करणे आणि सापांचे विष पुरवल्याच्या प्रकरणात प्रसिद्ध युट्युबर एल्विश यादवसह आठ जणांच्या विरोधात नोएडा पोलिसांनी 1200 पानांची चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमधून काही धक्कादायक खुलासेही झाले आहेत. नोएडा पोलिसांनी सांगितले की, युट्युबर एल्विश यादवने सापांसह त्यांचे विष पुरवण्यासाठी एक वर्च्युअल क्रमांकाचा वापर केला होता.

चार्जशीटमधून धक्कादायक खुलासे
चार्जशीटमध्ये म्हटलेय की, एल्विश ज्यावेळी पार्टीचे आयोजन करायचा तेव्हा साप आणि त्यांचे विष गरज भासल्यास मित्र विनय याला वर्च्युअल क्रमांकावरून फोन करायचा. विनय यानंतर ईश्वर नावाच्या व्यक्तीला फोन करायचा. ईश्वर याचा संपर्क राहुलसह अन्य सर्पमित्रांसोबत होता. याच आधारावर पोलिसांनी प्रकरणाचा उलगडा केला आहे.

ईश्वरच्या सांगण्यावरून सर्पमित्र त्याने सांगितलेल्या ठिकाणी यायचे. विनयच्या मोबाइलवर एल्विशचा वर्च्युअल क्रमांकावरून फोन आल्याचेही समोर आले आहे. एल्विशच्या अटकेनंतर नोएडा पोलसांनी त्याचा मित्र विनय आणि ईश्वरची चौकशी केल्यानंतर अटक केली. या तिघांना नंतर जामीनही मिळाला. सूत्रांनुसार ईश्वरच्या बॅक्वेंट हॉलमध्ये साप आणि त्यांचे विष पोहोचवले गेल्याचाही उल्लेख केला आहे. याशिवाय 24 जणांचा जबाबही चार्जशीटमध्ये आहे.

फोनमधील डिलीट केलेला डेटा मिळवला जाणार
साप आणि त्यांचे विष पार्टीमध्ये पुरवल्याच्या प्रकरणात एल्विशसह अटक करण्यात आलेल्या मित्रांचे फोन फॉरेंसिक लॅबमध्ये तपासाठी पाठवण्यात आले आहेत. टीमकडून मोबाईलमधील डिलीट करण्यात आलेला डेटाही रिकव्हर केला जाणार आहे. 

असा अंदाज लावला जातोय की, तिघांनी मोबाइलमधील असा डेटा डिलीट केलाय जो रेव्ह पार्टीचे आयोजन, साप आणि त्यांच्या विष पुरवण्यासंबंधित महत्त्वाचा पुरावा म्हणून समोर येऊ शकतो. तिघांच्या मोबाईलच्या फॉरेंसिंक तपासासाठी 15-20 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : 

किरण राव अमीर खानपासून का झाली विभक्त ? तीन वर्षांनी केला खुलासा

TV च्या 'या' अभिनेत्रींनीने केले बी ग्रेड चित्रपटांमध्ये केले काम, चौथे नाव ऐकून तुम्ही व्हाल शॉक?

देशातील सर्वाधिक महागडे तेलुगु अभिनेते, एका सिनेमासाठी घेतात 200 कोटी

Share this article