Pushpa 2 चा धडाकेबाज Teaser प्रदर्शित, अल्लू अर्जुनचा लुक बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सज्ज (Watch)

Published : Apr 08, 2024, 12:48 PM IST
Pushpa 2 Teaser Out

सार

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा पुष्पा: 2 चा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अल्लू अर्जुनचा लुक पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.

Pushpa 2 Teaser Out :  ‘पुष्पा 2’ सिनेमाची प्रेक्षकांकडून आतुरनेते वाट पाहिली जात आहे. अशातच सिनेमाचा टीझर सोमवारी (8 एप्रिल) प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) जबरदस्त लुक दिसून येत आहे. याआधी सिनेमातील रश्मिका मंदानाचा  (Rashmika Mandana) लुक आउट झाला होता.

पुष्पा 2 सिनेमाचा टीझर आउट
अ‍ॅक्शन सिनेमा असलेल्या ‘पुष्पा 2’ सिनेमात अल्लू अर्जुनने पायात घुंगरू आणि कानात झुमके घातल्याचे दिसून येत आहे. या सिनेमातून अल्लू अर्जुन धमाका करणार असल्याचीही आता चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

पुष्पा सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास तो वर्ष 2021 रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. याशिवाय सुकुमार यांच्या सिनेमातील गाणी ते डायलॉग्स सर्वाधिक पसंत करण्यात आले होते. 250 कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या पुष्पा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 373 कोटी रुपयांची कमाई केली होती.

कधी प्रदर्शित होणार सिनेमा
‘पुष्पा 2’ सिनेमा 15 ऑगस्ट, 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. सिनेमात फाहद फासिल आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असणार आहे. या सिनेमाचे बजेट पुष्पा सिनेमाच्या दुप्पट असल्याचे बोलले जात आहे.

आणखी वाचा : 

किरण राव अमीर खानपासून का झाली विभक्त ? तीन वर्षांनी केला खुलासा

अक्षय कुमारने ब्रेकअपवर मार्ग काढायचे सांगितले 3 मार्ग

सोनाली कुलकर्णीचा मराठमोळ लुक पाहिलात का ?

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!