Amitabh Bachchan Health News Fake : अमिताभ बच्चन एकदम ठणठणीत, प्रकृती बिघडल्याच्या बातम्या खोट्या

Published : Mar 16, 2024, 10:21 AM ISTUpdated : Mar 16, 2024, 10:59 AM IST
Amitabh Bachchan

सार

15 मार्चला बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या. यामुळे चाहत्यांनी बिग बी यांची प्रकृती लवकर सुधारण्यासाठी प्रार्थनाही केल्या.

Amitabh Bachchan Health Fake News : बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याच्या बातम्या शुक्रवारी (15 मार्च) समोर आल्या होत्या. या बातम्यांमध्ये अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी (Angioplasty) शस्त्रक्रिया झाल्याने रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर सोशल मीडियावर बिग बी यांची प्रकृती सुधारण्यासाठी त्यांच्या चाहत्यांसह सर्वांनी प्रार्थना केल्या होत्या. अशातच अमिताभ बच्चन यांनी प्रकृती बिघडल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.

अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या समोर आल्याच्या काही तासानंतर त्यांचा अभिषेक बच्चन यांच्यासोबतच एका फोटो समोर आला होता. खरंतर, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये (Dadoji Kondadev Stadium) इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमधील अंतिम सामन्यासाठी आले होते.

सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्याबद्दलच्या पोस्ट
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन स्टेडिअममधून बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहेत. यावेळीच काहींनी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारले असता त्यांनी सर्वकाही ठीक असल्याचे म्हटले. यानंतर एकाने विचारले की, तुमची प्रकृती कशी आहे? यावर उत्तर देत बिग बी म्हणाले की, “मी ठीक असून सर्व बातम्या खोट्या आहेत.”

अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल केल्याच्या बातम्या खोट्या
15 मार्चला दुपारपासूनच अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. यामध्ये म्हटले होते की, बिग बी रुटीन चेकअपसाठी कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात आले होते. याशिवाय काही बातम्यांमध्ये म्हटले होते की, अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या बातम्यांवर रुग्णालय किंवा अमिताभ बच्चन यांच्याकडून पुष्टी करण्यात आली नव्हती.

आणखी वाचा : 

अश्लील कंटेटच्या या 18 OTT प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने घातली बंदी

TMKOC मालिकेतील अभिनेत्री मुनमुन दत्ता व राज अनादकट यांनी गुपचुप उरकला साखरपुडा?

AR Rahman Exclusive : भारतीय सिनेमा व संगीताला उंच स्तरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे (VIDEO)

PREV

Recommended Stories

Dhurandhar X Review : अ‍ॅक्शन पॅक्ड, मास एंटरटेनर.. 'धुरंधर' पाहून प्रेक्षक काय म्हणाले?
सुंदर कविता आणि रचना अपूर्ण राहिल्या, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल केला पश्चाताप