प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी एशियानेट न्यूजसोबत खास बातचीत केली. यावेळी ए. आर. रहमान यांनी त्यांच्या काही प्रोजेक्ट्संदर्भात चर्चा केलीच. पण आयुष्यात यश नक्की कसे मिळते या मुद्द्यावरही ए. आर. रहमान बोलले.
AR Rahman Exclusive : एका लहान ब्रेकनंतर प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान मल्याळम इंडस्ट्रीमध्ये (Malayalam Industry) पुन्हा पाऊल ठेवण्यासाठी फार उत्साहित आहेत. यादरम्यान, एशियानेट न्यूजसोबत ए. आर. रहमान यांनी 'मस्क' संदर्भातील आपला अनुभव शेअर केला आहे. ए. आर. रहमान यांनी म्हटले की, संगीत तयार करणे म्हणजे धाडस लागते. काहीतरी नेहमीच वेगळे करण्याच्या दृष्टीकोन ते आतापर्यंत मिळालेल्या यशाच्या प्रवासाबद्दलही त्यांनी सांगितले. 'मस्क' ला ए.आर. रहमान यांनी एक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट असल्याचे म्हटले आहे. सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट अशी की, भारतीय संगीत आणि सिनेमाला उंच स्तरावर घेऊन जाण्यासाठी देखील प्रयत्न करावेत असेही ए. आर. रहमान यांनी सांगितले आहे.
आणखी वाचा :
Oscars 2024 : ऑस्करच्या मंचावरील जॉन सीनाचा लुक पाहून सर्वजण हैराण, पण नक्की कारण काय? जाणून घ्या
Oscars 2024 च्या मंचावर कला दिग्दर्शक नितिन देसाई यांना वाहिली श्रद्धांजली