PHOTOS & VIDEOS : अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला सलमान खान ते साक्षी धोनीची धमाकेदार एण्ट्री, पाहा पाहुण्यांचे एकापेक्षा एक हटके लूक

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा विवाहसोहळा येत्या 12 जुलैला राधिका मर्चेंटसोबत होणार आहे. याआधी दोघांच्या काही प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे. नुकतीच संगीत सेरेमनी 5 जुलैला मुंबईतील NMACC येथे पार पडली.

Chanda Mandavkar | Published : Jul 6, 2024 2:16 AM IST / Updated: Jul 12 2024, 04:48 PM IST
115
अनंत आणि राधिका धमाकेदार संगीत सोहळा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा संगीत सोहळा 5 जुलैला मुंबईतील NMACC येथे आयोजित करण्यात आला होता. यासाठी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला खास सजावट करण्यात आली होती. याचेच काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याशिवाय संगीत आणि स्टेजवर अनंत आणि राधिकाच्या नावातील पहिल्या अक्षराचा मिळून लोगोही लावण्यात आला होता.

215
अनंत-राधिकाचा संगीत सोहळ्यातील लूक

संगीत सेरेमनीसाठी अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटने एण्ट्री केल्यानंतर सर्वजण त्यांच्याकडे पाहत राहिले. संगीतसाठी अनंतने नेव्ही ब्लू अँड गोल्डन शेरवानी परिधान करत शाही लूक क्रिएट केला होता. तर राधिकाने ऑफ शोल्डर ब्लाऊजसह शानदार लेहेंगा परिधान केला होता. यामध्ये राधिका अत्यंत सुंदर दिसत होती. पापाराझींसमोर पोज दिल्यानंतर कपलने त्यांच्यासोबत सेल्फी फोटो देखील काढले.

315
पाहुण्यांची वर्दळ आणि लूकची चर्चा

संगीत सेरेमनीसाठी पाहुण्यांची फार मोठी वर्दळ पहायला मिळाली. यासाठी सलमान खानने उपस्थिती लावली होती. सलमान खानने संगीतसाठी काळ्या रंगातील टक्सिडो परिधान केला होता.

415
कपूर फॅमिलीची एण्ट्री

अनंत आणि राधिकाच्या संगीत सेरेमनीला आलिया भट्ट, रणबीर कपूरसह आदित्य रॉय कपूरनेही उपस्थिती लावली होती.

515
विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूरची उपस्थिती

विद्या बालनसोबत पती आणि निर्माते सिद्धार्य रॉय कपूर अनंत अंबानी आणि राधिकाच्या संगीत सेरेमनीला आले होते. यावेळी विद्या बालनने पेस्टल रंगातील आउटफिट्स परिधान केले होते.

615
पतीसोबत पोहोचली काजल अग्रवाल

व्यावसायिक गौतम किचलूसोबत प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीला आली होती.

715
महेंद्र सिंह धोनी पत्नी साक्षीचा लूक

माजी क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी पत्नी साक्षी धोनीसोबत संगीत सेरेमनीसाठी आला होता.

815
ऑरीचा हटके अंदाजातील लूक

सोशल मीडिया एंन्फ्लुएंसर ओरहान अवात्रामणिही अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीला आला होता.

915
अनंतची आजी आणि आत्याचीही एण्ट्री

अनंत अंबानीची आजी आणि मावशी म्हणजेच नीता अंबानींची आई पूर्णिमा दलाल आणि बहिण ममता दलाल संगीत सेरेमनीसाठी NMACC येथे आल्या होत्या.

1015
अनंत अंबानीच्या आत्याचीही उपस्थिती

मुकेश अंबानी यांची बहिण आणि अनंत अंबानीची आत्या दिप्ती साळगावकरही संगीत सेरेमनीला आली होती.

1115
बहिणीसोबत हॉट अंदाजात नेहा शर्माची एण्ट्री

अभिनेत्री नेहा शर्मा बहिण आयशा शर्मासोबत अत्यंत ग्लॅमरस अंदाजात अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीमध्ये एण्ट्री केली.

1215
रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरेची उपस्थिती

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लहान मुलगा तेजस ठाकरे आई रश्मि ठाकरेंसोबत आला होता.

1315
जावेद जाफरीची उपस्थिती

अभिनेता जावेद जाफरीनेही अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीला उपस्थिती लावली होती.

1415
पहाडिया ब्रदर्सची एण्ट्री

पाहाडिया ब्रदर्स म्हणजेच वीर पहाडिया आणि जान्हवी कपूरचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियाही संगीत सेरेमनीला आला होता.

1515
जावेद जाफरीच्या लेकाचीही उपस्थिती
Read more Photos on
Share this Photo Gallery