अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटची संगीत सेरेमनी 5 जुलैला होणार आहे. या संगीत सेरेमनीत धमाका करण्यासाठी आंतरराष्ट्रीय गायक जस्टिन बीबर मुंबईत दाखल झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, जस्टिनने संगीतवेळी परफॉर्मेन्स करण्यासाठी तगडी रक्कम वसूल केली आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटची संगीत सेरेमनी 5 जुलैला होणार आहे. या सेरेमनीमध्ये परफॉर्मेन्स करण्यासाठी गायक जस्टिन बीबर मुंबईत आला आहे.
27
जस्टिन बीबरचे फोटो व्हायरल
अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीवेळी परफॉर्मेन्स करण्यासाठी जस्टिन बीबर 4 जुलैला रात्रीच मुंबईत आला आहे. कलिना विमानतळावरील जस्टिनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
37
जस्टिन बीबरचा लूक
जस्टिन बीबर मुंबईत आल्यानंतर त्याचा सिंपल लूक दिसला. जस्टिनने गुलाबी रंगातील ओव्हरसाइज्ड स्वेट शर्ट आणि लाल रंगातील कॅप घातली होती.
47
जस्टिन बीबरने वसूल केली एवढी रक्कम
रिपोर्ट्सनुसार, जस्टिन बीबरने अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीवेळी परफॉर्मेन्स करण्यासाठी 83 कोटी रुपये वसूल केले आहेत. खरंतर, काही तासांसाठीच जस्टिन बीबर परफॉर्मेन्स करणार आहे.
57
सर्वाधिक फी वसूल करणारा महागडा गायक
अंबानींच्या सोहळ्यात 83 कोटी रुपये वसूल करणारा जस्टिन बीबर सर्वाधिक महागडा गायक ठरला आहे. याआधी रिहाना, बियॉन्से आणि शकिरानेही अंबानींच्या पार्टीत परफॉर्मेन्स केला होता.
67
संगीत सेरेमनीत धमाका करण्यास जस्टिन तयार
जस्टिन बीबर आज दिवसभर आराम करणार असून संध्याकाळी 7 वाजल्यानंतर अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या संगीत सेरेमनी वेन्यू जवळ पोहोचणार आहे.
77
कुठे पार पडणार संगीत सेरेमनी?
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटची संगीत सेरेमनी शुक्रवारी (05 जुलै) संध्याकाळी 7 वाजता नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या सेरेमनीला अंबानीच्या परिवारातील खास पाहुणे उपस्थितीत राहणार आहेत.