जामनगर येथे अनंत-राधिकाचे जंगी स्वागत, पुष्पवृष्टीसह आरती केल्याचा Video Viral

Published : Jul 17, 2024, 10:38 AM IST
anant ambani radhika merchant welcomed in Jamnagar

सार

Anant-Radhika in Jamnagar : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट लग्नानंतर पहिल्यांदाच जामगनर येथे पोहोचले. यावेळी कपलवर विविध रंगांची पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत करण्यात आले. याचेच काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Anant-Radhika in Jamnagar : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या विवाहसोहळा 12 जुलैला मुंबईत धुमधडाक्यात झाला. कपलचे लग्नानंतरही चार दिवस वेगवेगळे फंक्शन आयोजित करण्यात आले होते. अनंत-राधिकाच्या लग्नाला देश-विदेशातून अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, बॉलिवूड कलाकार ते राजकीय नेतेमंडळींनी उपस्थिती लावली होती. लग्नानंतर आता अनंत-राधिका आपले होम टाउन असलेल्या जामनगर येथे पहिल्यांदाच आले. यावेळी दोघांचे जंगी स्वागत करण्यात आले. याचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

पुष्पवृषी आणि आरतीने राधिका-अनंतचे स्वागत
जामनगर येथे पोहोचलेल्या राधिका मर्चेंट आणि अनंत अंबानीवर रंगबिरंगी फुलांची पृष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी महिलांनी पारंपारिक आउटफिट्स परिधान करत नवविवाहित जोडप्याची आरती करत त्यांचे स्वागत केले. दोघांचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनंत-राधिका अत्यंत आनंदित असल्याचे दिसून येत आहेत. दोघांनी हात जोडून सर्वांचे आभारही मानले. एका व्हिडीओमध्ये अनंत-राधिका कारमध्ये उभे राहून अत्यंत आनंदित होऊन सर्वांना अभिवादन करताना दिसून येत आहेत. दोघांचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाल्याचेही दिसतेय.

अनंत-राधिकाचा लूक
जामनगरला पोहोचलेल्या अनंत-राधिकाच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास राधिकाने गुलाबी रंगातील सूट परिधान केला होता. यावेळी राधिकाने अत्यंत सिंपल लूक केला होता. याशिवाय अनंतने लाल रंगातील कुर्ता आणि त्यावर एथनिक जॅकेट परिधान केले होते. दरम्यान, अनंत-राधिकाच्या लग्नाआधी दोघांचे जामनगरमध्ये ग्रँड प्री-वेडिंग सेलिब्रेशन आयोजित करण्यात आले होते. अनंतची आजी कोकिलाबेन अंबानी यांचा जन्म जामनगर येथील आहे. याशिवाय आजोबा धीरूभाई अंबानी आणि वडील मुकेश अंबानी यांनी आपल्या व्यवसयाची सुरुवातही जामनगर येथून केली होती.

आणखी वाचा : 

अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला पत्नीसोबत आलेल्या अक्षय कुमारला पाहून नेटकऱ्यांनी उपस्थितीत केले प्रश्न, म्हणाले...

'काही चुकले असल्यास माफ करा...', नीता अंबानींनी मागितली फोटोग्राफर्संची माफी

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!