
Amitabh Bachchan Deepfake Video : बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत असलेल्या कल्कि 2898 एडी सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे. अशातच काही दिवसांपूर्वी बिग बी यांचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता, यामागे उत्तराखंडमधील एक आयुर्वेदिक कंपनीच्या मालकाचा हात असल्याचे समोर आले होते. आरोपीने बिग बी यांचा डीपफेक व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर अपलोड केला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर व्यक्तीने अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. या व्यक्तीचे नाव अभिजीत पाटील असून कोर्टाने त्याचा अटकपूर्व जामिन फेटाळला आहे.
या कारणास्तव अपलोड केला होता डीपफेक व्हिडीओ
रिपोर्ट्सनुसार, आरोपीने कथि रुपात लैंगिक आरोग्यासंबंधित प्रोडक्ट्सला प्रोत्साहन देण्यासाठी अमिताभ बच्चन यांचा अश्लील डीपफेक व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर अभिजीत पाटीलने अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती.
अभिजित पाटीलने म्हटले होते की, माझ्या विरोधातील आरोप खोटे आणि बनावट आहेत. मी कोणताही अपराध केलेला नाही. पोलिसांनी याचिकेचा विरोधत करत म्हटले की, सेलिब्रेटींचे फोटो वापरुन बनावट व्हिडीओ तयार केल्याने जमीन मिळणार नाही. याशिवाय फिर्यादीच्या पक्षाने दावा केला की, या व्हिडीओमुळे जगभरात बिग बी यांच्या व्यक्तीमत्वाला नुकसान पोहोचली आहे. यानंतरच न्यायाधीशांनी अभिजित पाटील याची याचिका फेटाळली आहे.
बिग बीं च्या टीमकडून तक्रार
बिग बी यांच्या कायदेशीर टीमने काही डीपफेक व्हिडीओ समोर आल्यानंतर 4 मे रोजी मुंबई सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यामध्ये अश्लील भाषेचा वापर करत अभिजित पाटील यांच्या कंपनीच्या प्रोडक्ट्सचे प्रमोशन करण्यात येत असल्याचे दाखवण्यात आले होते.
बिग बीं च्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास अमिताभ बच्चन नुकतेच कल्कि 2898 एडी सिनेमात झळकले आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. सिनेमाने आतापर्यंत भारतात 536.75 कोटी रुपयांची कमाई केली होती. याशिवाय हिंदी भाषेत सिनेमाने 228.9 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
आणखी वाचा :
AR च्या शक्ती पूजेला बॉलिवूडमधील सेलेब्सच्या लूकचा जलवा, पाहा PHOTOS
आकाशच्या तुलनेत अनंत अंबानीची लग्नपत्रिका 366% महागडी, खासियत काय?