
Amitabh Bachchan Cryptic Post : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या परिवाराने उपस्थिती लावली होती. लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बिग बी नेहमीच सोशल मीडियावर ब्लॉग लिहितात. अशातच अमिताभ बच्चन यांनी एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. बिग बी यांनी ब्लॉगमध्ये काय कमावले आणि काय गमावले याबद्दल लिहिले आहे. याशिवाय जुन्या गोष्टी आणि कोणत्या गोष्टी विचित्र वाटतात याबद्दलही लिहिले आहे. याच ब्लॉगवर सोशल मीडियातील युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांनी काय म्हटलेय?
अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, एक शानदार लग्नसोहळ्यातून परत आल्यानंतर आणि एवढ्या दीर्घकाळानंतर सर्वांना भेटून प्रेम आणि स्नेह मिळाले. जुन्या व्यक्तींना भेटून असे वाटते की, शारिरीक ओखळ बदलली गेली आहे.
बिग बीं ची क्रिप्टिक पोस्ट
पुढे अमिताभ बच्चन यांनी म्हटले की, “हेच आयुष्य असून...आपलेपण, प्रेम आणि काळजी...हा सर्वच गोष्टी विचित्र आहेत. कशाप्रकारे, लहान-लहान गोष्टी एकमेकांसाठी फार महत्वाच्या असून त्या घडतात. पण ज्यांच्यासोबत आपले सखोल संबंद असतात अथवा उत्तम वेळ घालवता त्यावेळच्या आठवणी कायम राहतात. Is lost and forgotten...ठिक आहे. सत्यात विसरलेलो नाही. पण सध्या शांततेत घेतले आहे. हे अशावेळी आठवणीत काढले आहे जेव्हा नातेसंबंधांचा खरा अर्थ असेल.”
लग्नसोहळ्यात बच्चन परिवारापासून दूरावलेली दिसली ऐश्वर्या
रेड कार्पेटवर अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन, मुलगा ऐश्वर्या बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चनसोबत पापाराझीसमोर पोझ दिल्या. बच्चन परिवाराच्या फोटोमध्ये निखिल नंदा आणि त्यांची मुलं नव्या, अगस्त्य दिसून आले. याशिवाय अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्या बच्चनेही लग्नसोहळ्यात स्वतंत्रपणे एण्ट्री केली. पण फॅमिली फोटोमध्ये सहभागी झाली नाही.
अमिताभ बच्चन आणि अंबानी परिवाराचे नातेसंबंध
अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग ऐश्वर्यासंबंधित नसल्याचा वाटत आहे. पण ब्लॉगमधील शब्दांमधून कळतेय की, अंबानी परिवारासोबत जुन्या नातेसंबंधाबद्दल अमिताभ बच्चन यांनी आठवण काढल्याचे दिसून येत आहे. अमिताभ बच्चन यांच्या वाईट काळात मुकेश अंबानींच्या वडिलांनी मदतीसाठी विचारले होते. पण त्यावेळ अमिताभ बच्चन यांनी नकार दिला होता.
आणखी वाचा :