कतरिना कैफ आई होणार? अनंत-राधिकाच्या लग्नातील लूकवरुन नेटकऱ्यांनी उपस्थितीत केले प्रश्न (Watch Video)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्याला बॉलिवूड ते परदेशातील पाहुण्यांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले. पण कतरिना आणि विक्कीने एण्ट्री केली तेव्हा वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

Chanda Mandavkar | Published : Jul 12, 2024 3:32 PM IST / Updated: Jul 12 2024, 09:04 PM IST

Katrina Kaif  Look in Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा विवाहसोहळा 12 जुलैला मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरला पार पडत आहे. कपलच्या लग्नसोहळ्याला देश-विदेशातील पाहुण्यांसह बॉलिवूडमधील कलाकारांनी उपस्थितीत लावल्याचे दिसून आले आहे. याशिवाय लग्नाला संपूर्ण अंबानी परिवार आनंदात असल्याने आजचा सोहळा धुमधडाक्यात पार पडणार हे नक्की. पण विक्की कौशल आणि कतरिना कैफने लग्नसोहळ्यात एण्ट्री केली तेव्हा वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. यावेळी कतरिना कैफचे बेबी बंप दिसत असल्याचे बहुतांशजणांनी नोटीस केले आहे. पण खरंच कतरिना आई होणार आहे का?

कतरिनाच्या लूकवरुन चर्चा
कतरिना कैफने विक्की कौशलसोबत अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात एण्ट्री केली. यावेळी कतरिनाने सिंपल आणि सोबर लूक क्रिएट करत लाल रंगातील साडी नेसली होती. याशिवाय फुल सिल्व्ह्ज ब्लाऊज परिधान केले होते. तर विक्की कौशलने फ्लोरल प्रिंट शेरवानी आणि ओढणीने लूक पूर्ण केला होता. पण करिना जेव्हा पापाराझींसमोर पोज देण्यासाठी विक्कीसोबत येते तेव्हा तिचा बेबी बंप दिसत असल्याच्या नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

काय म्हणतायत नेटकरी?
सोशल मीडियावरील एका युजरने म्हटले की, “ती खरंच प्रेग्नेंट आहे. तिच्या चेहऱ्यावरुन सर्वकाही दिसतेय”. दुसऱ्याने म्हटले की, “तिचा बेबी बंप दिसतोय”, तिसऱ्याने म्हटले की, “कॅट इज प्रेग्नेंट”. याशिवाय अन्य युजरने लिहिले की, “प्रत्येकाने वेस्टर्न पद्धतीची साडी नेसली आहे. पण कतरिनाचा साडीतील लूक एलिगेंट दिसतोय.”

दीपिका पादुकोणच्या घरीही लवकरच पाळणा हलणार
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या घरीही लवकरच पाळणा हलणार आहे. कपलने चिमुकल्याचे आगमन होणार असल्याची खास पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली होती. याशिवाय दीपिका पादुकोणला अनेकदा बेबी बंप फ्लॉन्ट करताना स्पॉट करण्यात आले आहे. याआधी दीपिकाने परिधान केलेला पिवळ्या रंगातील गाउनमधील बेबी बंपच्या लूकची जोरदार चर्चा झाली होती. दुसऱ्या बाजूला रणवीर सिंह दीपिकाची सर्वोतोपरी काळजी घेताना वेळोवेळी दिसून येत आहे.

आणखी वाचा : 

Anant Ambani Radhika Merchant Wedding : नवरदेव अनंत अंबानीचा FIRST PHOTO, नवरदेवाने स्वतःच्याच लग्नात केला जोमाने डान्स

Anant-Radhika Wedding : अंबानी परिवाराच्या लग्नसोहळ्यासाठी बॉलिवूड सेलिब्रेटी ते परदेशी पाहुण्यांचे आगमन, पाहा Guest Looks फोटोज

Read more Articles on
Share this article