"हिंदुत्त्वाशी गद्दारी केलेल्यांना क्षमा नाही"... म्हणत 'धर्मवीर-2' सिनेमाची रिलीज डेट जाहीर, पाहा Photos

Dharmaveer 2 Movie : मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी ‘धर्मवीर-2’ सिनेमाचे रविवारी (30 जून) पोस्टर लाँच केले. यावेळी काही दिग्गज कलाकारांची उपस्थिती दिसून आली. याशिवाय सिनेमाच्या रिलीजची डेटही जाहीर करण्यात आली आहे.

Chanda Mandavkar | Published : Jul 1, 2024 7:43 AM IST / Updated: Jul 01 2024, 01:15 PM IST
15
धर्मवीर-2 सिनेमाचे पोस्टर लाँच

'धर्मवीर - 2'... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट... या सिनेमाचा पोस्टर लाँच सोहळा रविवारी (30 जून) मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर पार पडला. 

25
दिग्गज कलाकारांची उपस्थिती

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ज्येष्ठ दिग्दर्शक व अभिनेते सचिन पिळगावकर, ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या शुभहस्ते या सिनेमाचा पोस्टर लाँच सोहळ्यावेळी उपस्थितीत होते. 

35
सिनेमाच्या निर्मात्यांसह झी स्टुडिओच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती

सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई, अभिनेता प्रसाद ओक, क्षितिज दाते, झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलकर, सादिक चितळीकर आणि झी स्टुडिओजचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

45
गुरुवर्य आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट सिनेमात दिसणार

साहिल मोशन आर्टस् आणि झी स्टुडिओज यांची निर्मिती असलेल्या 'धर्मवीर-२' साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट या सिनेमातून पुन्हा गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांची पुढची गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे.

55
सिनेमाची रिलीज डेट

‘धर्मवीर-2’ सिनेमा महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी प्रदर्शित केला जाणार आहे. सिनेमा येत्या 9 ऑगस्टला रिलीज होणार आहे. याआधी आलेल्या ‘धर्मवीर’ सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने गुरुवर्य आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती.

आणखी वाचा : 

लग्नाच्या सात दिवसानंतर सोनाक्षी सिन्हाने दाखवले खरे रंग, पती जहीरसोबतचा व्हिडीओ व्हायरल

Kalki 2898 AD Box Office : जगभरात 'कल्कि' सिनेमाचा डंका, या चार सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक करत रचला इतिहास

Share this Photo Gallery