हिना खान कामावर परतली, इंस्टाग्रामवर Video शेअर करत कॅन्सरशी लढणाऱ्यांना दिला महत्वाचा सल्ला

Published : Jul 15, 2024, 09:28 PM ISTUpdated : Jul 15, 2024, 09:29 PM IST
Hina Khan

सार

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने गेल्या काही दिवसांपूर्वी तिला तिसऱ्या स्टेजमधील ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती दिली होती. याशिवाय कीमोथेरपी आधी आणि नंतरचा अनुभव देखील हिनाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Entertainment : अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करत आहे. आपल्या धमाकेदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या हिनाला आज सर्वजण ओखळतात. अभिनेत्रीने काही मालिका आणि सीरिजमध्ये काम केले आहे. याशिवाय प्रेक्षकांनी हिनाला बिग बॉसच्या घरात अधिक पसंत केले होते. अशातच हिना खानसंदर्भात एक बातमी समोर आली आहे. यामुळे हिनाचे चाहते नाराज झाले आहेत. 

ब्रेस्ट कॅन्सरचा सामना करतेय हिना
हिना खानने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली होती की, ती ब्रेस्ट कॅन्सरचा सामना करत आहे. या आजारावर उपचार देखील सुरु झाले आहेत. हिनाने तिला झालेल्या आजाराची माहिती दिल्यानंतर अनेकजण चितेंत पडले होते.

किमोथेरपीनंतर कामावर परतली हिना खान 
किमोथेरपी झाल्यानंतर हिना खान कामावर परतली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, माझ्या उपचारानंतर माझे पहिले वर्क असाइनमेंट आहे. याशिवाय कामासह आयुष्याबद्दलच्या काही गोष्टींबद्दलही हिनाने भाष्य केले आहे. हिना खानने पुढे म्हटले की, मला नेहमीच काम करत रहायचे आहे. काहीजण उपचारादरम्यान कोणत्याही अडथळ्याशिवाय सातत्याने काम करतात. मी देखील त्यापैकी एक असून वेगळी नव्हे. काही महिन्यांमध्ये काहीजणांना भेटण्याची संधी मिळाली. यामुळे माझा दृष्टिकोन बदलला. माझ्यावर उपचार सुरु आहेत. पण नेहमीच मी रुग्णालयात नसते. यामुळेच तुमच्या सर्वांसाठी आली आहे. व्हिडीओच्या अखेरीस हिनाने स्टिच मार्क लपवण्याचा देखील प्रयत्न करत असल्याचेही दाखवत आहे.

 

हिना खानला सिनेमात रिप्लेस
 हिना खान डिज्नी प्लस हॉटस्टारवरील सिनेमा 'राप्चिका रीटा' मध्ये झळकणार होती. सिनेमाची कथा कोर्ट रुम ड्रामा होता. यामध्ये हिना खान वकीलाच्या भूमिकेत दिसून येणार होती. पण असे सांगितले जात आहे की, ब्रेस्ट कॅन्सरच्या कारणास्तव हिनाला सिनेमात रिप्लेस करण्यात आले आहे. हिनाएवजी सिनेमात अदा शर्माला घेण्यात आले आहे. दरम्यान, निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हिना खानचे चाहते नाराज 
हिना खानला सिनेमात रिप्लेस केल्यानंतर तिचे चाहते नाराज झाले आहेत. काहीजण असे म्हणतायत की, हिना खानला आजारपणामुळे रिप्लेस करायला नको होते. हिना खान नेहमीच अधिक मेहनत करते. ती एक उत्तम कलाकार आहे. यामुळे आजारपणामुळे रिप्लेस करणे चुकीचे आहे.

आणखी वाचा : 

Rakul Preet Singh चा भाऊ अमन प्रीत सिंहला ड्रग्ज प्रकरणात हैदराबाद पोलिसांकडून अटक

इम्रान हाश्मीला ऐश्वर्या रायवर केलेल्या विधानाचा पश्चाताप, म्हणाला- माफी मागायची आहे, पण का?

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Ramayana: ४ हजार कोटींच्या 'रामायण'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये हवा! रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर धमाका
Jailer 3: रजनीकांतचा स्वॅग, बालय्या आणि विजय सेतुपतीची एन्ट्री; 'जेलर 3' चा मेगा प्लॅन ठरला?