Rakul Preet Singh चा भाऊ अमन प्रीत सिंहला ड्रग्ज प्रकरणात हैदराबाद पोलिसांकडून अटक

Published : Jul 15, 2024, 05:50 PM ISTUpdated : Jul 15, 2024, 05:52 PM IST
Rakul Preet Singh  brother Aman Preet Singh Arrested

सार

Rakul Preet Singh Brother Arrested : अभिनेत्री रकुल प्रीत सिंहसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. रकुलचा भाऊ अमन प्रीत सिंहला पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरण ड्रग्ज संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.

Entertainment News : बॉलिवूडमधील अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या (Rakul Preet Singh) आयुष्यात सर्वकाही सुरळीत सुरु नसल्याचे दिसून येत आहे. याआधी रकुलचे साससे वासु भगनानी (Vashu Bhagnani) यांच्याबद्दलची बातमी समोर आली होती, ते कर्जाखाली बुडाल्याने त्यांना आपले कार्यालय विक्री करावे लागले होते. अशातच अभिनेत्रीच्या भावासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. रकुल प्रीत सिंहचा भाऊ अमन प्रीत सिंहला (Aman Preet Singh) पोलिसांनी अटक केली आहे. 2 कोटी रुपयांच्या कोकेन प्रकरणात अमनप्रीतला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे प्रकरण?
तेलुगु चॅनलच्या रिपोर्ट्सच्या हवाल्यानुसार, रकुल प्रीत सिंहचा भाऊ अमन प्रीत सिंहला साइबराबाद पोलिसांनी ड्रग्ज संदर्भातील प्रकरणात अटक केली आहे. रिपोर्ट्सनुसार, अमनकडून चार नायजेरियन व्यक्तींकडून कथित रुपात ड्रग्ज खरेदी करत होता. बातम्यांनुसार असेही म्हटले जातेय की, ड्रग्ज पेडलर्सला अटक करण्याआधीच पोलिसांनी अमनकडून दोन कोटी रुपयांचे 200 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. यामध्ये अमनप्रीत कथित आरोपी असल्याचे सांगितले जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हैरदाबाद पोलिसांनी शहराबाहेरील परिसरात राजेंद्र नगर येथे एक ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड केला आहे. राजेंद्र नगर पोलीस आणि स्पेशल ऑपरेशन टीमने ड्रग्ज प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्रीच्या भावाला अटक केली आहे. वर्ष 2021 मध्ये रकुल प्रीत सिंहची देखील ईडीकडून ड्रग्ज आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिचे कथित संबंध असल्याबद्दल चौकशी केली आहे. या प्रकरणात अनेक तास अभिनेत्रीची चौकशी करण्यात आली होती. याशिवाय रकुल प्रीत सिंहे बँक स्टेटमेंट दाखवण्यासही सांगण्यात आले होते.

रकुल प्रीतच्या कामाबद्दल थोडक्यात
रकुल प्रीतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेत्री लवकरच अजय देवगणचा सिनेमा 'दे दे प्यार दे-2' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागात देखील रकुल प्रीतच होती. या व्यतिरिक्त अभिनेत्रीकडे सध्या दुसरे कोणतेही प्रोजेक्ट्स नाहीत.

आणखी वाचा : 

इम्रान हाश्मीला ऐश्वर्या रायवर केलेल्या विधानाचा पश्चाताप, म्हणाला- माफी मागायची आहे, पण का?

कतरिना कैफ आई होणार? अनंत-राधिकाच्या लग्नातील लूकवरुन नेटकऱ्यांनी उपस्थितीत केले प्रश्न (Watch Video)

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Ramayana: ४ हजार कोटींच्या 'रामायण'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये हवा! रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर धमाका
Jailer 3: रजनीकांतचा स्वॅग, बालय्या आणि विजय सेतुपतीची एन्ट्री; 'जेलर 3' चा मेगा प्लॅन ठरला?