आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि अभिनेता संग्राम सिंह दुबईतील प्रो-रेसलिंग चॅम्पियनशिपच्या माध्यमातून कमबॅक करणार आहे. येत्या 24 फेब्रुवारीला पाकिस्तानातील रेसलर मोहम्मद सईद याच्यासोबत त्याचा रेसलिंगचा सामना होणार आहे.
Wrestler Sangram Singh Exclusive Interview : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि अभिनेता संग्राम सिंहचा कुस्तीचा सामना येत्या 24 फेब्रुवारीला पाकिस्तानातील कुस्तीपटू मोहम्मद सईद याच्यासोबत रंगणार आहे. या दोघांमधील सामना दुबई येथील शबाब-अल-अहली स्टेडिअममध्ये होणार आहे. खरंतर, संग्राम सिंहने दीर्घकाळानंतर कुस्तीच्या क्षेत्रात कमबॅक केले आहे. दुबईतील सामन्याआधी संग्राम सिंह याने Asianet News Hindi ला विशेष मुलाखत दिली.
प्रश्न : 24 फेब्रुवारीच्या सामन्यासाठी कशी तयार केलीय?
उत्तर : मी सात वर्षांतर कुस्तीच्या आखाड्यात कमबॅक करत आहे. याशिवाय पाकिस्तानी कुस्तीपटू मोहम्मद सईद आपल्या देशासाठी एमॅच्युअर रेसलिंग करत असून त्याचे वय 22-23 वर्ष आहे. कुस्तीच्या सामन्यासाठी पूर्णपणे तयारी केली असली तरीही सर्वकाही देवाच्या हातात आहे. माझे असे मानणे आहे की, सामना व्यवस्थितीत पार पडावा. सामन्यानंतर काहीजण मला ट्रोलही करतील. पण यामुळे लाखो तरुणांना प्रोत्साहन मिळेल हेच मी लक्षात ठेवले आहे.
प्रश्न : कुस्तीच्या क्षेत्रात कमबॅक का करावेसे वाटले?
उतर : मी याआधी देशासाठी 96 किलोच्या वेट कॅटेगरीमध्ये मॅच्युअर रेसलिंग करायचो. त्यानंतर मी WWE आणि प्रोफेशनल रेसलिंग देखील केली. आधी खेळामध्ये पैसे मिळायचे नाही. फक्त वाटायचे, आपण देशाचे प्रतिनिधित्व केल्यास नोकरी मिळेल. काही टार्गेट नव्हते की, पदक जिंकायचे. पण आता खूप आर्थिक स्थिती सुधारली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये रेसलिंगबद्दल खूप चर्चा केली जातेय, पण त्यामागील कारणे वेगळी आहेत. मला आजही आठवते की, जेव्हा सुशीलने वर्ष 2008 मध्ये पहिले पदक जिंकले होते तेव्हा मॉर्डर्न रेसलिंगला एक वेगळी ओळख मिळाली होती. मी पहिला असा कुस्तीपटू होतो ज्याने वेगवेगळ्या टेलिव्हिजनवरील शो मध्ये काम केले. आता कुस्तीत ऐवढ्या अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे नागरिकांनी आपल्या मुलांना या क्षेत्रापासून दूर नेले आहे. त्यांना हा एक कॉन्ट्रोवर्शिअल खेळ वाटतो. यामुळेच मी रेसलिंगमध्ये कमबॅक करत आहे.
प्रश्न : तरुणांच्या मनात रेसलिंगबद्दल संभ्रम आहे, पण या सामन्यानंतर तरुणांना प्रेरणा मिळेल?
उत्तर : रेसलिंगच्या जगात कमबॅक करण्यामागील माझा उद्देश हाच आहे की, तरुणांना यामुळे प्रेरणा मिळावी. मी वर्ल्ड प्रोफेशनल रेसलिंग हबशी जोडलो गेलो होते, तेव्हा त्यांना तुम्ही तीन-चार सामने परदेशात खेळवा आणि त्यानंतर भारतात खेळवा असा सल्ला दिला होता. दर आठवड्याला कुस्ती व्हायला हवी असे मला वाटत होते. मग ते 5 स्टारमध्ये असो, रिंगणात असो, क्लबमध्ये असो, रस्त्यावर असो किंवा परिसरात असो. आमच्या तरुण मुलांना बाहेरच्या रेसलरसोबत खेळण्याची संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे. आपल्या देशातून एखादा संघ बाहेर जातो तेव्हा त्यात फक्त 7-8 रेसलर जाऊ शकतात, तर देशात करोडो मुले-मुली कुस्ती खेळतात. एखादा गावातील असेल आणि तो बाहेरच्या रेसलरशी खेळला तर त्याचे नावच नाही तर करिअरही होईल. यापूर्वी वर्ल्ड प्रोफेशनल रेसलिंग हबने वाराणसी, हैदराबाद, फरीदाबाद येथे रेसलिंगचे आयोजन केले होते. आता दुबईत होणाऱ्या चॅम्पियनशिपसाठी जगभरातून कुस्तीपटू येत आहेत. माझ्या खेळण्यामागचा एक उद्देश हा आहे की, मुलांना आपण तेंडुलकर किंवा कोहली व्हायचे आहे असे वाटू नये. त्याने कुस्तीपटू व्हावे अशी माझी इच्छा आहे. तरुणांनी कुस्तीला निवडवावे आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून द्यावे.
प्रश्न : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि प्रोफेशनल कुस्तीपटू यामधील फरक काय?
उत्तर : मी याआधी कुस्ती खेळायचो. पण आता मी प्रो झालो आहे. यामध्येही ऑलपिंकप्रमाणे नियम आणि स्टाइल आहे. फक्त यामध्ये अधिक स्टॅमिना आणि ताकद लागते. प्रो-रेलसिंगमध्ये ऑलपिंक सामन्यापेक्षा अधिक राउंड होतात. याचा उद्देश असा की, अधिकाधिक प्रेक्षकांनी खेळ पहावा. मी सोशल मीडियावर नॉन-क्रिकेटर्सला सर्वाधिक फॉलो करणारा सेलिब्रेटी आहे. मला असे वाटते की, सोशल मीडियाचा सदुपयोग केला पाहिजे. जसे की, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'फिट इंडिया', 'खेलो इंडिया' उपक्रमांची सुरूवात केली आहे.
प्रश्न : तुमच्या फिटनेसचे सीक्रेट काय आहे? देशातील तरुण तुमच्या फिटनेसमुळे प्रेरित होतील का?
उत्तर : मी पूर्णपणे व्हेजिटेरियन असून दोनच काम करतो. एक म्हणजे काम किंवा व्यायाम. ज्या दिवशी मी व्यायाम करत नाही त्या दिवशी जेवत नाही. योगाभ्यास आणि मेडिटेशनही करतो. मला असे वाटते की, तुम्ही दररोज व्यायाम केला, पचनास हलके अन्नपदार्थ खाल्ल्यास तुम्ही फिट राहू शकता. तुम्हा सर्वांना फिटनेस मंत्रा देतो की, जेवण भूकेपेक्षा कमी, पाणी दुप्पट प्या, व्यायाम तिप्पट करा आणि चारपट हसा. तरच तुम्ही आयुष्यात फिट रहाल. आपण कितीही प्रोटीन-व्हिटॅमिनचे सेवन केले तरीही आनंदी नसलो तर याचा काहीही फायदा नाही. जो आनंदी आहे तोच यशस्वी होतो.
प्रश्न : तुमचा डाएट प्लॅन काय आहे? ज्यामुळे तुम्ही ऐवढे फिट आहात
उत्तर : माझी सकाळ गायत्री मंत्राने होते आणि रात्री झोपण्याआधी हनुमान चालीसाचा वाचतो. डाएटमध्ये सकाळी फळ किंवा ज्यूसचे सेवन करतो. ड्राय फ्रुट्स खातो. दुपारीच्या जेवणात वरण, भाजी, दही किंवा छास, सॅलड आणि चपातीचे सेवन करतो. याशिवाय देसी तूपही जेवणात वापरतो. संध्याकाळी सूप किंवा खिचडीचे सेवन करतो. रात्री झोपण्याआधी गूळ मिक्स केलेले दूध पितो. तीन-चार मजले चढतो-उतरतो. कधीच लिफ्टचा वापर करत नाही. प्रत्येक दिवशी दोन ते तीन तास व्यायाम करतो. मी फक्त सहा तास झोप घेतो. नेहमीच प्रयत्न करतो की, सूर्योदयापूर्वी उठेन. आपले शरीर निसर्गानुसार चालते.
प्रश्न : देशातील तरुणांना कुस्ती क्षेत्रात जायचे असल्यास त्यांनी काय करावे?
उत्तर : प्रत्येकाने आधी स्वत: ला ओखळावे. स्वत: वर विश्वास निर्माण केला पाहिजे. याशिवाय पालकांनीही आपली स्वप्न मुलांना पूर्ण करण्यासाठी जबरदस्ती करू नये. त्यांना महत्त्व द्यावे. देशाला सरकार नव्हे संस्कार चालवतात. प्रत्येकाचे जे काही स्वप्न आहे ते करण्यापासून त्याला कधीच रोखू नका. सर्वाधिक मोठा मंत्र असा की, रिजेक्शनच तुमचे मोटिव्हेशन आहे. मी प्रत्येक ठिकाणी जातो, मला नकार दिला जातो. याला मी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतो.
प्रश्न : तुम्ही स्वत:ला मोटिव्हेट कसे करता?
उत्तर : यश-अपयशाला फारसे महत्त्व देऊ नका, यादरम्यानची जी प्रोसेस आहे त्याचा आनंद घ्या. जे होणार आहे ते होईल. आपण नेहमीच उत्तम देण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मनात आपण असे केले तर त्याचा परिणाम काय होईल याचा विचार असला पाहिजे. मी एक सिनेमा केलाय, तो लवकरच प्रदर्शित होणार आहे. माझे मित्र आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी म्हटले की, तुम्ही येथील तरुणांसाठी काहीतरी करा. तरुण नशेच्या दिशेने जात आहेत. गुन्हेगारीसंदर्भातील सिनेमे पाहत आहेत. अशातच मी जो सिनेमा केलाय तो तरुणांना वाईट कामांपासून दूर राहण्यासाठी नक्कीच प्रेरित करेल.
प्रश्न : तुमच्या आगामी सिनेमाचे नाव आणि कधी प्रदर्शित होणार?
उत्तर : 'उड़ान जिंदगी की' असे सिनेमाचे नाव असून येत्या मार्च महिन्यात ओटीटी (OTT) वर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तुम्हाला 'दंगल', 'सुल्तान' सिनेमाप्रमाणे मजा येणार आहे. सिनेमाचे शुटिंग हरियाणातच झाले आहे.
आणखी वाचा :
बॉलिवूडमधील सर्वाधिक महागडा कलाकार, या सिनेमासाठी घेतले 275 Cr
मिमी चक्रवर्ती अभिनय सोडून बनली खासदार, आता राजकरणातूनही घेतली एक्झिट