Suhani Bhatnagar : 'दंगल' फेम सुहानी भटनागरचे निधन, वयाच्या 19व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Suhani Bhatnagar :'दंगल' सिनेमामध्ये बबिता फोगटची बालपणाची भूमिका साकारणारी सुहानी भटनागरचे निधन झाले आहे. वयाच्या 19व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

Suhani Bhatnagar : बॉक्सऑफिसवर गाजलेल्या 'दंगल' सिनेमामध्ये बबिता फोगटची बालपणीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागरचे (Suhani Bhatnagar) निधन झाले आहे. वयाच्या 19 वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. 

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुहानीच्या शरीरामध्ये पाणी जमा झाले होते, यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. काही महिन्यांपूर्वी सुहानीचा अपघात झाला, यामध्ये तिचा पाय फ्रॅक्चर (Suhani Bhatnagar Fractured Leg) झाला होता. औषधोपचारादरम्यानच तिचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

सुहानी भटनागरला नेमके काय झाले होते?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पायाला झालेल्या फ्रॅक्चरवर उपचार सुरू असताना सुहानीला देण्यात आलेल्या औषधांचे तिच्यावर दुष्परिणाम झाले आणि हळूहळू तिच्या शरीरामध्ये पाणी जमा होऊ लागले. दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दीर्घकाळापासून तिच्यावर उपचार सुरू असल्याचे म्हटले जात आहे. तिच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

'दंगल'मधील सुहानीचा दमदार अभिनय

नितीश तिवारी दिग्दर्शित 'दंगल' सिनेमामध्ये सुहानी भटनागरने (Suhani Bhatnagar) महावीर फोगट (Aamir Khan) यांची मुलगी बबिता फोगटची भूमिका साकारली होती. सिनेमातील तिचा दमदार अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. मोठ्या पडद्यावरील झायरा वसीम (गीता फोगट) सोबतच्या तिच्या शानदार केमिस्ट्रीने प्रेक्षकांना खूप हसवले आणि रडवलेही.

वर्ष 2016मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाने जगभरामध्ये सुमारे 2 हजार कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटामध्ये बबिता फोगटची तरुणपणातील व्यक्तिरेखा अभिनेत्री सान्या मल्होत्राने साकारली होती. 'दंगल' सिनेमाव्यतिरिक्त सुहानी भटनागर काही टीव्ही जाहिरातींमध्येही झळकली होती. यानंतर अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ती काही काळ अभिनय क्षेत्रातून विश्रांती घेतली. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या सुहानी भटनागरची 25 नोव्हेंबर 2021नंतर एकही पोस्ट दिसली नाही.

आणखी वाचा

भारतीयांशी लग्न करणाऱ्या NRIसाठी कठोर नियम, या कारणासाठी विधि आयोगाने उचलले मोठे पाऊल

French Journalist : 'भारत देश सोडण्यास भाग पाडले' OCI कार्डच्या वादानंतर फ्रेंच महिला पत्रकाराची प्रतिक्रिया

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : 8 वर्षात शेतकऱ्यांना 1.54 लाख कोटी रुपयांची दिली नुकसान भरपाई, योजनेची ही आहेत वैशिष्ट्ये

Share this article