वयाच्या 59 व्या लग्न करणार? आमिर खान म्हणतो...

Published : Aug 27, 2024, 01:45 PM ISTUpdated : Aug 27, 2024, 04:36 PM IST
Aamir Khan Wants To Quit Movies

सार

आमिर खानने आपल्या तिसऱ्या लग्नाच्या अफवांना पुर्णविराम लावले आहे. आमिरने म्हटले की, वयाच्या 59 व्या वर्षी लग्न करण्याची काय गरज आहे. खरंतर, मित्रपरिवारामुळे मला कधीच एकटे वाटत नाही.

Aamir Khan over 3rd Wedding : बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान देशातील प्रसिद्ध अभिनेत्यापैकी एक आहे. आमिर खानच्या भूमिकेचे नेहमीच कौतुक केले जाते. यासाठी खूप मेहनतही आमिर करतो. पण आमिर खानच्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच बोलले जाते.

दरम्यान, गेल्या तीन वर्षांपूर्वी पत्नी किरण रावपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. खरंतर, दोघांनी सहमताने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. याआधी वर्ष 2002 मध्ये आमिर खानने आपली पहिली पत्नी रीना दत्तासोबत घटस्फोट घेतला होता.

आमिर खान तिसरे लग्न करणार?
आमिर खान सध्या 59 वर्षांचा आहे. नुकताच आमिरच्या लेकीचे लग्न देखील झाले. यानंतर सातत्याने अशा अफवा सुरु झाल्या होत्या की, आमिर खान लवकरच तिसरे लग्न करणार आहे. आमिर खानच्या खासगी संबंधांबद्दल वेगवेगळे तर्कवितर्कही लावले जात होते.

दरम्यान, आमिर खानने अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या एका पॉडकास्टच्या मुलाखतीत गेस्ट म्हणून आला होता. या मुलाखतीत रियाने आमिर खानला तिसऱ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला. यावर आमिर खानने उत्तर देत म्हटले की, माझे वय आता 59 वर्ष आहे. या वयात लग्न करुन मी काय करू? एकटे राहणे मुश्किल आहे. पण माझा एक परिवार आहे. भाऊ-बहीण, मुलं आणि मित्रपरिवारही आहे.

आमिरच्या मुलाखतीमधील उत्तराने त्याच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. याशिवाय सध्या आमिर लग्नासाठी तयार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. आमिर खान अखेर लाल सिंह चड्ढा सिनेमात दिसला होता. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

आणखी वाचा : 

Stree-2 सिनेमाच्या कमाईत 12 व्या दिवशी मोठी घट, तरीही प्रेक्षकांची गर्दी कायम

श्रीकृष्णाच्या प्रेमसरात बुडालेली राधा...पाहा Tamannaah Bhatia चे मनमोहक PHOTOS

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!