Stree-2 सिनेमाच्या कमाईत 12 व्या दिवशी मोठी घट, तरीही प्रेक्षकांची गर्दी कायम

Published : Aug 27, 2024, 11:01 AM IST
Stree 2 Box Office Collection Day 12

सार

Stree 2 Box Office Day 12 Collection : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर स्री-2 सिनेमाचा सध्या बॉक्स ऑफिसवर डंका आहे. पण सिनेमाच्या 12 व्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी घट झाली आहे. तरीही प्रेक्षकांचा सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Stree 2 Box Office Day 12 Collection : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या स्री-2 सिनेमाने वर्ष 2024 मधील कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. सिनेमा रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच स्री-2 सिनेमाची 12 व्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. खरंतर, सिनेमाच्या कमाईत घट झाली आहे. Sancilk.com च्या रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने 12 व्या दिवशी 17 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर 11 व्या दिवशी स्री-2 सिनेमाची कमाई 42.4 कोटी रुपये होती. सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 401.55 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

स्री-2 सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्री-2 सिनेमा 15 ऑगस्टला प्रदर्शित झाला. रिलीज झाल्यानंतर सिनेमाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद देण्यास सुरुवात झाली. सिनेमाने पहिल्याच दिवशी 60.3 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. सिनेमाने तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी 31.5 आणि 43.85 कोटी रुपयांची कमाई केली होती. सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करत असून आताही कमाईत घट झाली असली तरीही कॉमेडी-हॉरर सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी होत आहे.

स्री-2 सिनेमाचे बजेट
अमर कौशिक यांनी स्री-2 सिनेमाचे दिग्दर्शन केले असून दिनेश विजान हे निर्माते आहेत. स्री-2 सिनेमाचे बजेट 60 कोटी रुपयांचे असल्याचे सांगितले जाते. सिनेमाने रिलीज झाल्यानंतर अवघ्या 12 दिवसातच सहापट अधिक कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर स्री-2 सिनेमाने 401.55 कोटी रुपये कमावले आहेत. याशिवाय जगभरात सिनेमाने 559.73 कोटींची धमाकेदार कमाई केली आहे.

सिनेमामध्ये श्रद्धा कपूर, राजकुमार रावसह पंकज त्रिपाठी, आपारशक्ति खुराना, अभिषेक बनर्जी मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय सिनेमात अक्षय कुमार, वरुण धवन आणि तमन्ना भाटिया यांचा कॅमियो आहे.

वर्ष 2018 मध्ये आला होता ‘स्री’
स्री-2 सिनेमा वर्ष 2018 मध्ये आलेला स्री सिनेमाचा सिक्वल आहे. स्री सिनेमात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. सिनेमाच्या ट्रेलर लाँच इवेंटवेळी निर्माते दिनेश विजान यांनी घोषणा केली होती की, सिनेमाचा तिसरा भाग म्हणजेच स्री-3 देखील तयार केला जाईल.

आणखी  वाचा : 

गोविंदा रे गोपाळा...दहीहंडीनिमित्त या 8 मराठमोळ्या गाण्यांवर धरा ठेका

श्रीकृष्णाच्या प्रेमसरात बुडालेली राधा...पाहा Tamannaah Bhatia चे मनमोहक PHOTOS

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!