FMGE नापास १३ जणांना नोंदणी! सायबर पोलिसांकडून अटक

FMGE नापास १३ जणांना नोंदणी! सायबर पोलिसांकडून अटक

Published : Nov 18, 2026, 01:02 PM IST

नवी मुंबईत महाराष्ट्र सायबर पोलिसांनी वैद्यकीय नोंदणीतील मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. परदेशातून MBBS शिक्षण घेतल्यानंतर FMGE परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या वेबसाइटवर बेकायदेशीर नोंदणी करण्यात आली होती. याप्रकरणी १३ वैद्यकीय विद्यार्थी आणि टोळीतील ३ मुख्य आरोपी अशा १६ जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिकचा राहुल पाटील प्रत्येक उमेदवाराकडून १५ ते २० लाख रुपये घेत होता. भोपाळचा धर्मेंद्र सिंह आणि गाझियाबादचा शिवम सिंह बनावट प्रमाणपत्रे व नोंदणी करून देत होते. महाराष्ट्रातील २२ उमेदवारांकडून सुमारे ४ ते ५ कोटी रुपये गोळा केल्याचा अंदाज आहे. वेबसाइटच्या सुरक्षेला बगल देऊन नोंदणी कशी केली, याचा तपास सुरू असून आणखी १० ते १२ जणांना अटक होण्याची शक्यता आहे. कौन्सिल किंवा परीक्षा संस्थेतील अधिकाऱ्यांचा सहभाग अद्याप निष्पन्न झालेला नाही.