Description: केतन प्रकरणात सिया गोयलच्या आईने पहिल्यांदाच मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेमुळे दोन कुटुंबं उद्ध्वस्त झाल्याचं त्यांनी सांगितलं. जर या प्रकरणात कोणताही दोषी आढळला तर त्याला कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं. स्वतःच्या मुलीचा दोष सिद्ध झाला तरी तिलाही शिक्षा व्हावी अशी भूमिका त्यांनी घेतली. तसेच सिया आणि केतन यांच्यात चांगले संबंध होते, लग्नाबाबत कोणतीही नाराजी व्यक्त झाली नव्हती, असा दावाही त्यांनी केला. याशिवाय प्रेमसंबंध, पार्टी आणि इतर आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.