
प्रवीण गोयल यांनी FDA कारवाईबाबत भूमिका स्पष्ट केली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दुकानातून चार नमुने तपासणीसाठी घेतल्याचे त्यांनी सांगितले. दुकानातील सर्व वस्तूंची खरेदी बिले अधिकाऱ्यांना देण्यात आली असून परवाना नव्या पत्त्यावर अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नवीन परवाना मिळेपर्यंत दुकान बंद ठेवण्याच्या सूचना FDA ने दिल्या असून त्या सूचनांचे पालन करत असल्याचे त्यांनी सांगितले. दुकान सील करण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट करत काही कट रचला जात असल्याचा संशय व्यक्त केला. मात्र, कायद्यावर पूर्ण विश्वास असून चौकशीत जे निष्पन्न होईल ते स्वीकारू, असेही त्यांनी म्हटले.