अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे डीपफेक फोटो-व्हिडीओ व्हायरल, White Houseने दिली अशी प्रतिक्रिया

डीपफेकची चिंता अमेरिकेत वाढली आहे. शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे काही डीपफेक फोटो आणि व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल झाले आहेत. यामुळे व्हाइट हाऊसने याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Joe Biden Deepfake : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे काही डीपफेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यासंदर्भात ब्लूमबर्ग (Blumberg) येथील एका प्रवक्त्यांनी म्हटले की, जो बायडेन यांचे डीपफेक झालेले फोटो सोशल मीडियावरुन हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याआधी भारतात देखील डीपफेकसंदर्भात प्रतिष्ठित व्यक्तींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

डीपफेकसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचा वापर
आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचा (Artificial Intelligence) वापर करून डीपफेक फोटो-व्हिडीओ तयार केले जातात. त्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येतात. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीआधी डीपफेक फोटो-व्हिडीओ व्हायरल केले जातील अशी भीती बहुतांश हाय प्रोफाइल व्यक्तींना वाटत आहे. अमेरिकेत याआधीही काही हाय प्रोफाइल व्यक्ती डीपफेकच्या शिकार झाल्या आहेत.

राष्ट्रपती भवनाने व्यक्त केली चिंता
आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचा वापर करून दिशाभूल करणारे व्हिडीओ आणि ऑडिओ तयार केले जात आहे. या प्रकरणात मूळ शोधणे देखील कठीण असते. वर्ष 2024 च्या सुरुवातीपासून एआयच्या माध्यमातून डीपफेक व्हिडीओ-फोटोंच्या प्रकरणात वाढ झाली आहे.

अमेरिकेतील राष्ट्रपती भवन व्हाइट हाऊसने चिंता व्यक्त केली आहे. व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव करीन जीन पियरे यांनी म्हटले की, बनावट फोटोंबद्दल फार चिंता वाटत आहे. आम्ही या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी जे काही करू शकतो ते करण्याचा प्रयत्न करत आहोत.

आणखी वाचा : 

Shocking! हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या नादात आरोपीकडून लागली संपूर्ण इमारतीला आग, 76 जणांचा मृत्यू

Russian Plane Crash : 65 युक्रेनी कैद्यांना घेऊन जाणाऱ्या रशियातील हवाई दलाच्या विमानाला अपघात, पाहा दुर्घनेचा धक्कादायक VIDEO

तुम्ही मुलांना कारच्या खिडकीजवळ बसवता का? नक्की पाहा अंगावर काटा आणणरा VIDEO

Share this article