भारतीय दूतवासाने मध्यपूर्वेतील देश बहारिन (Bahrain) येथे डिजिटल फी कलेक्शन किऑस्कची सुरुवात केली आहे. यासाठी ICICI बँक आणि इलेट्रॉनिक पेमेंट सिस्टिम BSC यांनी भारतीय दूतवासासोबत हातमिळवणी केली आहे.
PM Modi To Attend Launch Of UPI Services In Sri Lanka, Mauritius : यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेसचा (UPI) आता जगभरात वापर करता येणार आहे. भारतानंतर परदेशातील काही देशांमध्ये युपीआय प्रणालीचा नागरिकांना वापर करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (11 फेब्रुवारी) श्रीलंका (Sri Lanka) आणि मॉरिशससाठी (Mauritius) यूपीआय प्रणाली लाँच केली आहे. या दोन्ही देशांमध्ये यूपीआय आणि रुपे (RuPay) प्रणालीचा वापर करता येणार आहे.
याआधी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये (France) आयफेल टॉवरवर यूपीआयची (Eiffel Tower) प्रणाली औपचारिकरित्या सुरू करण्यात आली होती. फ्रान्सकडून यूपीआयची सेवा संपूर्ण देशात हळूहळू सुरू करणार आहे. जाणून घेऊया मॉरिशस आणि श्रीलंकेत यूपीआय प्रणालीची सुरुवात झाल्याने सर्वाधिक फायदा कोणाला होणार याबद्दल सविस्तर.…
यूपीआय प्रणाली ग्लोबल झाल्याने कोणाला होणार फायदा?
यूपीआय प्रणाली मॉरिशस आणि श्रीलंकेत जाणाऱ्या भारतीय प्रवाशांना किंवा या दोन्ही देशांमधून भारतात येणाऱ्या पर्यटकांना फायदा होणार आहे. मॉरिशसमध्ये रुपे प्रणाली सुरू झाल्याने दोन्ही देशांतील नागरिकांना फायदा होईल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर माहिती देत म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेचे राष्ट्रपती (President Ranil Wickremesinghe) रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ (PM Pravind Jugnauth) यांच्यासोबत व्हर्च्युअली कनेक्ट होत यूपीआय आणि रुपे प्रणाली लाँच केली आहे.
श्रीलंका आणि मॉरिशससोबत भारताचे उत्तम नातेसंबंध
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, मॉरिशसमध्ये रुपे कार्ड सुविधा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे यूपीआय आणि रुपे सुविधेचा फायदा मित्रदेशांना देखील करून दिला जाणार आहे. श्रीलंका आणि मॉरिशस सोबतचे भारताचे उत्तम नातेसंबंध आहेत. या सुविधा सुरू झाल्यानंतर दोन्ही बाजूने डिजिटल ट्रांजेक्शनच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
या देशात किऑस्कची सुरुवात
फेब्रुवारी महिन्यातच 7 तारखेला भारतीय दूतवासाने भारतीय मध्यपूर्वेतील देश बहारिन (Bahrain) येथे डिजिटल फी कलेक्शन किऑस्कची (Kiosk) सुरुवात केली आहे. यासाठी ICICI बँक आणि इलेट्रॉनिक पेमेंट सिस्टिम BSC यांनी भारतीय दूतवासासोबत हातमिळवणी केली आहे. या सर्विसेसमुळे बहारिन येथे राहणाऱ्या 3.40 कोटी भारतीयांना फायदा होणार आहे. अशातच डेबिट-क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पासपोर्ट रिन्युअल, बर्थ रजिस्ट्रेशनसारख्या कामांचे शुल्क भरणे सोपे होणार आहे.
आणखी वाचा :
अमेरिका चंद्र मोहिमेसाठी सज्ज, 14 फेब्रुवारीला लाँच होणार मिशन