पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी नेत्यांना पाजले ज्ञानामृत, लोकशाही यशस्वी करण्यासाठी करावे लागेल हे काम

Pakistan Army Chief : स्वार्थी भावना बाजूला सारून एकत्रित काम करावे लागेल, तरच लोकशाही यशस्वी होऊ शकेल, अशा शब्दांत पाकिस्तानचे लष्करप्रमुख सय्यद असीम मुनीर (Asim Munir) यांनी नेत्यांना ज्ञानामृत पाजले आहे. 

Harshada Shirsekar | Published : Feb 10, 2024 9:11 AM IST / Updated: Feb 10 2024, 04:57 PM IST

Pakistan Army Chief : पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान (Pakistan Election Results 2024) झालेल्या हेराफेरीच्या आरोपावरून निदर्शने केली जात आहेत. पाकिस्तानी लष्करासाठी निवडणुकीचा निकाल मोठा संदेश असल्याचे मानले जात आहे.

इम्रान खान (Imran Khan) यांच्या पीटीआय पक्षाला विजयी होण्यापासून रोखण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी त्यांच्या पक्षाला पाठिंबा दर्शवणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीमध्ये सर्वाधिक विजय मिळवला आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख नेमके काय म्हणाले?

निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यामध्ये उशीर होत आहे. यादरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख सय्यद असीम मुनीर (Syed Asim Munir) यांचे मोठे विधान समोर आले आहे. देशातील नेतेमंडळींनी स्वार्थी भावनांचा त्याग केला तरच लोकशाही यशस्वी होऊ शकेल, अशा शब्दांत त्यांनी नेत्यांना ज्ञानामृत पाजले आहे. 

पाकिस्तानी लष्कराची मीडिया विंग ISPR च्या (इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स) माहितीनुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असे म्हणाले आहेत की, "निवडणूक आणि लोकशाही हे पाकिस्तानातील नागरिकांची सेवा करण्याचे साधन आहे. त्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला जाऊ नये. देशातील समस्या सोडवू शकेल अशा नेतृत्वाची आवश्यकता आहे".

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे नेत्यांना ज्ञानामृत

लष्करप्रमुख म्हणाले, "निवडणूक ही केवळ जय-पराजयाची स्पर्धा नाही. निवडणूक म्हणजे जनतेचा जनादेश ठरवण्याची कसरत आहे. राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वार्थ भावनेतून बाहेर पडले पाहिजे. समन्वय साधून जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकशाहीला कार्यक्षम बनवण्याचा हा एकमेव मार्ग आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असेही म्हणाले की, “पाकिस्तानच्या जनतेने संविधानावर विश्वास व्यक्त केला आहे. यास राजकीय परिपक्वता आणि एकजुटीने उत्तर देणे हे आता सर्व राजकीय पक्षांवर अवलंबून आहे".

आणखी वाचा

Bengal: TMC नेत्याच्या अटकेची मागणी, आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने या भागात इंटरनेटसेवा बंद

काँग्रेसने देशाचा विकास मंदावला, आम्ही विक्रमी वेगाने केले काम - PM नरेंद्र मोदी

Mithun Chakraborty : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये केले दाखल

Share this article