Viral : उडणारी कोंबडी कधी पाहिलेय का? पाहा सोशल मीडियात व्हायरल होणारा VIDEO

Published : Jan 13, 2024, 05:10 PM ISTUpdated : Jan 13, 2024, 05:12 PM IST
hen

सार

सोशल मीडियामध्ये उडणाऱ्या कोंबडीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील कोंबडी नदीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत न थांबता उडत असल्याचे दिसून येत आहे.

Viral Video : सोशल मीडियात नेहमीच मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लहान मुलांचे तर कधी प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात. अशातच आता सोशल मीडियात उडणाऱ्या कोंबडीचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील कोंबडी एखाद्या पक्षाप्रमाणे उडताना दिसतेय.

सोशल मीडियात व्हायरल उडणारी कोंबडी
कोंबडी सर्वसामान्यपणे एखाद्या पक्षाप्रमाणे उडत नाही. पण सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कोंबडी चक्क उडताना दिसतेय. कोंबडी नदीच्या एका टोकावरुन दुसऱ्या टोकापर्यंत न थांबता उडताना दिसतेय. कोंबडीच्या उडण्याच्या या क्षमतेला पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. कोणालाही विश्वास बसत नाहीय की, खरंच कोंबडी उडू शकते. 

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कोंबडीचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, मॅरेथानमधील कोंबडी. दुसऱ्याने म्हटले की, कोंबडीमध्ये उडण्याचे Hidden Talent आहे. अशाप्रकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया युजर्सने दिल्या आहेत. 

कोंबडीच्या व्हिडीओला 12.3 दशलक्ष व्हूज मिळाले आहेत. याशिवाय व्हिडीओ @AMAZlNGNATUREच्या नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

VIDEO : उडणाऱ्या कोंबडीचा पाहा व्हिडीओ

 

आणखी वाचा : 

अलास्का एअरलाइन्स विमानाचे आपत्कालीन लँडिंग, विमानाच्या खिडकीची काच हवेतच निघाल्याचा पाहा धक्कादायक VIDEO

विमानात गर्भवतीसोबत सीट बदलण्यास त्याने दिला नकार, टीकेऐवजी नेटकऱ्यांनी दिला पाठिंबा

सोमालियामध्ये MV LILA NORFOLK जहाज हायजॅक, जहाजावर आहेत 15 भारतीय क्रू मेंबर्स

PREV

Recommended Stories

बांगलादेशी नागरिकाने भारतीय विद्यार्थिनींची काढली छेड, लोकांमध्ये संताप (WATCH)
पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांना मिळाली 'असीम' शक्ती, बनले पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस!