भारतातील एसयूव्ही सेगमेंटमध्ये नव्याने दाखल झालेली टाटा सियारा आणि बाजारात स्थिरावलेली होंडा एलेव्हेट यांच्यात मोठी स्पर्धा आहे. सियारा आपल्या नवीन इंजिन आणि फीचर्समुळे चर्चेत आहे, तर एलेव्हेट तिच्या दमदार सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी ओळखली जाते.
टाटा सियाराचा वाजला अलार्म, होंडा कंपनीची हि गाडी देणार टक्कर; कमी किंमतीत फीचर्स क्वालिटी
भारतात एसयूव्ही सेगमेंटमधील गाडयांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या गाड्या घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असते. आपण आज एलेव्हेट आणि सियारा या दोन गाड्यांमधला फरक समजून घेऊयात.
26
टाटा सियाराने लोकांच्या मनात स्थान केलं तयार
या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने नवीन Tata Sierra लाँच झाली आहे. हि एसयूव्ही लॉन्चमध्ये अनेकांच्या मनात घर केलं आहे. या दोन गाड्या आता स्पर्धा करणार आहेत.
36
टाटा मोटर्सने सियारा गाडी मार्केटमध्ये आणली
टाटा सियारा गाडीचं इंजिन मजबूत असून एसयूव्ही तीन 1.5-लिटर इंजिनांनी सुसज्ज आहे, जी 75.8 किलोवॅट पॉवर आणि 139 एनएम टॉर्क निर्माण करते. ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे. या गाडीमध्ये कंपनीकडून अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.
परत एकदा होंडा कंपनीची एलेव्हेट गाडी चर्चेत आली आहे. या गाडीने मार्केटमध्ये आपलं स्थान तयार केलं असून त्यामध्ये सुरक्षेचे चांगले दमदार फीचर्स दिले आहेत.
56
गाडीमध्ये काय आहेत फीचर्स?
या गाडीने मार्केटमध्ये आपलं स्थान तयार केलं असून त्यामध्ये सुरक्षेचे चांगले दमदार फीचर्स दिले आहेत. यात सहा एअरबॅग, लेव्हल-2 आधारित 20 प्रकारचे ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम (ADAS), ESP, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, हिल-होल्ड असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, रियर वायपर आणि वॉशर, रियर डिफॉगर तसेच ISOFIX चाइल्ड सीट अँकरिंग यांसारखी महत्त्वाची सुरक्षा वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
66
होंडा एलेव्हेट गाडीची किती आहे किंमत?
होंडा एलेव्हेट या गाडीची किंमत हि ११ लाखांपासून सुरु होत असून शेवट तिची किंमत हि १६.६७ लाखांपर्यंत जाते. दुसरीकडे टाटा सियारा या गाडीची किंमत ११.४९ लाखांपासून सुरु होत असते.