हे कसं काय झालं, महिंद्रा कंपनीची हि इलेक्ट्रिक गाडी ४ लाखांनी झाली स्वस्त; फीचर्स ऐकून पायाला येतील मुंग्या

Published : Dec 05, 2025, 05:10 PM IST

महिंद्राने त्यांच्या BE6 आणि XEV 9e या लाँग-रेंज इलेक्ट्रिक SUV च्या किमतीत तब्बल ₹4 लाखांची कपात केली आहे. 656 किलोमीटरची रेंज आणि 79 kWh बॅटरी पॅक असलेल्या या गाड्या आता अधिक ग्राहकांना आकर्षित करत आहेत. 

PREV
15
हे कसं काय झालं, महिंद्रा कंपनीची हि इलेक्ट्रिक गाडी ४ लाखांनी झाली स्वस्त; फीचर्स ऐकून पायाला येतील मुंग्या

महिंद्राने त्यांच्या BE6 आणि XEV 9e इलेक्ट्रिक SUV च्या लाँग-रेंज व्हेरिएंटच्या किमतीत ₹4 लाखांची कपात केली आहे. त्यामुळं या गाड्यांच्या किंमती काही प्रमाणात आवाक्यात आल्याचं दिसून आलं आहे.

25
गाडीची किती किलोमीटरची आहे रेंज?

या गाडीची रेंज हि ६५६ किलोमीटरची असून तिची किंमत कमी झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता हि गाडी खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. हि गाडी खरेदी केल्यानंतर आपल्याला लांब पाल्याचा प्रवास सहजपणे करता येणार आहे.

35
किती आहे बॅटरी बॅकअप

या गाडीला कंपनीकडून चांगला बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे, त्यामुळं लांब पल्ल्याचा प्रवास सहजपणे करता येणार आहे. 79 kWh चा मोठा बॅटरी पॅक उपलब्ध असल्यामुळं आपण या गाडीतील ड्रायव्हिंगचा आनंद घेता येणार आहे.

45
किंमत कमी करून ग्राहकांना केलं आकर्षित

कंपनीने गाड्यांची किंमत कमी करून ग्राहकांना आपल्याकडं आकर्षित केलं आहे. ग्राहकांना कमी किंमतीत इलेक्ट्रिक गाडी खरेदी करता यावी आणि तिच्या ड्रायव्हिंगचा आनंद घेता यावा हा यामागचा हेतू होता.

55
कंपनीच्या सर्वात चांगल्या किंमतीच्या गाड्या

महिंद्रा कंपनीच्या सर्वात चांगल्या किंमतीच्या या इलेक्ट्रिक गाड्या असून त्या घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे. ग्राउंड क्लिअरन्स आणि इलेक्ट्रिक गाडीची रेंज जास्त असल्यामुळं ग्राहकांची संख्या वाढली आहे.

Read more Photos on

Recommended Stories