रोख पैसे, कार्ड किंवा मोबाईल जवळ असण्याची आवश्यकता नाही, चेहरा दाखवून करा पेमेंट

आता दुकानात सामान खरेदी करत असताना मोबाईल किंवा पाकीट जवळ बाळगण्याची काही आवश्यकता राहणार नाही. आपण स्माईल पे म्हणजेच चेहरा दाखवल्यानंतर सुलभ पद्धतीने पेमेंट करू शकणार आहेत. 

आता दुकानात वस्तू खरेदी केल्यानंतर पेमेंट करणे अधिक सोपे झाले आहे. तुम्हाला रोख पैसे द्यावे लागणार नाहीत किंवा कार्ड पेमेंटची गरज नाही. एवढेच नाही तर पेमेंटसाठी तुम्हाला तुमच्या खिशातून मोबाईल काढावा लागणार नाही. तंत्रज्ञानाच्या युगात, आता तुम्ही Smile Pay द्वारे पेमेंट करू शकता, तेही कोणतीही जोखीम न घेता हे करू शकता. तुमचा चेहरा दाखवल्यानंतरच तुमचे पेमेंट केले जाईल. फेडरल बँकेने सुलभ बिल पेमेंटसाठी स्माईल पेची नवीन पद्धत सुरू केली आहे. ते सुरक्षित आणि सोपे असल्याचा दावाही बँकेने केला आहे.

स्माईल पे म्हणजे काय? भारतातील पहिले अद्वितीय पेमेंट तंत्रज्ञान

अशा प्रकारची पेमेंट प्रणाली फेडरल बँकेने प्रथमच सुरू केली आहे. हे UIDAI च्या BHIM आधार पे वर तयार केलेल्या प्रगत फेशियल ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करते. स्माईल पे वापरणारे ग्राहक फक्त त्यांचा चेहरा स्कॅन करून पेमेंट करू शकतात. ही सुविधा वापरणाऱ्या ग्राहकांना बिल भरण्यासाठी रोख रक्कम, कार्ड किंवा मोबाईल फोन वापरण्याची गरज नाही.

smipay चे विशेष वैशिष्ट्य

Share this article