Simple Tricks To Fix Salty Curry : स्वयंपाक करताना कधीकधी घाईत मीठ जास्त पडतं. जास्त मीठ खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही. अशावेळी अन्न फेकून न देता चव संतुलित करण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरा.
स्वयंपाक करताना कधीकधी घाईत मीठ जास्त पडतं. जास्त मीठ खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही. अशावेळी अन्न फेकून न देता चव संतुलित करण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरा.
26
लाल तिखट -
जसं लोखंड लोखंडाला कापतं, तसंच मसाला मसाल्यालाच कमी करतो. जास्तीचं मीठ कमी करण्यासाठी तुम्ही आमटी किंवा भाजीत लाल तिखट किंवा हिरवी मिरची घालू शकता.
36
बटाटा -
बटाट्याला थोडी गोड चव असते आणि तो मसाले शोषून घेतो. त्यामुळे तुमच्या आमटीत बटाटा घालणं खूप फायदेशीर ठरू शकतं. यामुळे मीठ कमी होतंच, शिवाय चवही वाढते.
जर तुम्हाला बटाट्याची चव आवडत नसेल, तर आमटी किंवा भाजीत बेसन घालणं उत्तम पर्याय आहे. थोडं बेसन घालून, नंतर थोडं पाणी घालून चांगलं शिजवा. शिजल्यानंतर सर्व्ह करा.
56
देशी तूप -
देशी तूप घातल्याने मीठ, लाल तिखट किंवा गरम मसाल्याचा प्रभाव प्रभावीपणे संतुलित होतो. सर्व्ह करण्यापूर्वी किंवा करताना देशी तूप घाला. यामुळे चव आणि मीठ नक्कीच संतुलित होईल.
66
दह्याचा वापर -
तुम्ही दह्याचा वापर देखील करू शकता. यामुळे तिखटपणा कमी होतो आणि मिठाचा खारटपणाही संतुलित होतो. लक्षात ठेवा की, मीठ नेहमी प्रमाणातच वापरावे.