Raksha Bandhan 2024 : ऑनलाइन पद्धतीने राखी खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी

Online Rakhi Buying Tips : यंदाच्या रक्षाबंधनाच्या सणाला ऑनलाइनप पद्धतीने राखी खरेदी करण्याचा विचार करत असल्यास कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया.

Raksha Bandhan 2024 :  प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यंदा रक्षाबंधन येत्या 19 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. या दिवशी बहिणीकडून भावाला राखी बांधली जाते. यासाठी बहिणीकडून भावाला सुंदर अशी राखी खरेदी केली जाते. मार्केटमध्ये वेगवेगळ्या आकाराची आणि रंगांची राखी खरेदी करू शकता. पण यंदाच्या रक्षाबंधनावेळी ऑनलाइन पद्धतीने खरेदी करण्याचा विचार करत असाल्यास कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया.

अधिकृत वेबसाइटवरुन खरेदी करा
ऑनलाइन पद्धतीने राखी खरेदी करताना नेहमीच वेबसाइट तपासून पहा. राखीची डिझाइन पसंत पडली असली तरीही अधिकृत वेबसाइटवरुन खरेदी करा. चुकीच्या वेबसाइटवरुन राखी खरेदी केल्यास तुमची फसवणूक होऊ शकते.

राखीची क्वालिटी तपासून पहा
ऑनलाइन राखी खरेदी करताना त्याची क्वालिटी तपासून पहा. यासाठी प्रोडक्ट्ससंदर्भात दिलेली माहिती व्यवस्थितीत वाचा. याशिवाय राखी कोणत्या धाग्यापासून तयार केली आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल.

किंमत आणि डिस्काउंट
ऑनलाइन पद्धतीने राखी खरेदी करताना त्याची किंमत थोडी वाढवली जाते. अशा स्थितीत अन्य साइट्सवरुनही राखीची किंमत तपासून पाहू शकता. याशिवाय दोन वेबसाइटची तुलना करुन कोणत्या ठिकाणाहून खरेदी करणे सोयीस्कर आहे हे देखील तुम्हाला पाहता येईल.

डिलिवरीची तारीख आणि पत्ता
राखी खरेदी केल्यानंतर त्याची डिलवरी तारीख नक्की पहा. अन्यथा रक्षाबंधनाच्या दुसऱ्या किंवा अन्य दिवशी राखी घरी डिलिवरी केली जाईल. याशिवाय महत्वाची बाब अशी की, राखी खरेदी करताना तुमचा योग्य पत्ता लिहा.

रिव्हू आणि रेटिंग तपासून पहा
प्रत्येक वेबसाइटवर कोणत्याही प्रोडक्ट्सच्या खाली स्क्रोल केल्यानंतर ग्राहकांनी लिहिलेले रिव्हू असतात. एखादी राखीची डिझाइन पसंत पडल्यास त्याचे फोटो अथवा रिव्हू नक्की पहा. यामुळे कळू शकते राखी नक्की कशाप्रकारे दिसते.

रिटर्न आणि रिफंड पॉलिसी
राखी खरेदी करताना रिटर्न आणि रिफंड पॉलिसीबद्दल जाणून घेऊया. प्रत्येक वेबसाइटवर रिटर्न आणि रिफंड पॉलिसी असते. यानुसार काही प्रोडक्ट्सवर रिफंड पॉलिसी नसते. यामुळे ग्राहकांचे नुकसान होऊ शकते. अशातच तुम्हीही ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर रिटर्न पॉलिसीबद्दल नक्की तपासून पहा.

आणखी वाचा : 

Raksha Bandhan 2024 : भावासाठी बनवा स्पेशल राखी, पाहा DIY VIDEO

Raksha Bandhan 2024 निमित्त बहिण-भावाला खास Wishes, Messages पाठवून साजरा करा सण

Read more Articles on
Share this article