Hyundai India : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, ह्युंदाई मोटर इंडियाने सुमारे 11,000 गाड्या विकून एक नवीन विक्रम केला आहे. नवीन जीएसटी दरातील बदल आणि सणासुदीच्या ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ह्युंदाई मोटर इंडियाने एक जबरदस्त विक्रम केला आहे. गेल्या पाच वर्षांत एकाच दिवसात एकाच कंपनीकडून सर्वाधिक डीलर बिलिंगसह सुमारे 11,000 गाड्या विकल्या गेल्या आहेत. ह्युंदाईच्या इतिहासातील हे एक मोठे यश मानले जात आहे. हा विक्रम GST 2.0 च्या नवीन किमती लागू होण्याच्या पहिल्याच दिवशी झाला. याचा चांगला इम्पॅक्ट बघायला मिळाला आहे.
25
ह्युंदाईची नवरात्री स्पेशल ऑफर
कंपनीने 22 सप्टेंबर रोजी सर्व मॉडेल्सवर संपूर्ण कर सवलत देऊन ग्राहकांना आकर्षित केले. या ऑफर्स आणि किमतीतील कपातीचा विक्रीवर मोठा परिणाम झाला. ह्युंदाईच्या क्रेटा, अल्काझार सारख्या SUV मॉडेल्सनी विक्रीत आघाडी घेतली. नवीन GST नियमांमुळे, क्रेटा एन-लाईन आणि स्टँडर्ड मॉडेल्सच्या किमतीत सुमारे ₹71,762 ते ₹72,145 पर्यंत कपात करण्यात आली आहे. क्रेटा आणि अल्काझार या कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
35
ह्युंदाईच्या विक्रीत मोठी वाढ
अल्काझार मॉडेल्सवर ₹75,376 पर्यंत सूट मिळाल्याने ग्राहकांना मोठा फायदा झाला आहे. प्रीमियम टक्सन एसयूव्हीवर ₹2.40 लाखांपर्यंतची किंमत कपात जाहीर झाली आहे. तसेच, वेन्यू कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर ₹1.23 लाख, तर i20 आणि एक्सटर मॉडेल्सवर अनुक्रमे ₹98,053 आणि ₹89,209 पर्यंत सूट देण्यात आली आहे. ग्रँड i10 निओस, ऑरा यांसारख्या एन्ट्री-लेव्हल कार्सवरही ऑफर्स आहेत. जीएसटी रिफॉर्मचा फायदा घेताना ग्राहक दिसत आहेत.
या किमतीतील बदल आणि ऑफर्समुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड ग्राहकांना उत्तम मूल्य, विश्वास आणि आनंद देण्यासाठी कटिबद्ध आहे. ह्युंदाईचे संचालक आणि सीओओ तरुण गर्ग यांनी या विक्रमाला गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम एक-दिवसीय कामगिरी म्हटले आहे. तसेच सणासुदीच्या काळातही मोठ्या अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. सणासुदीला कार आणण्याकडे ग्राहकांचा भर दिसतोय
55
ह्युंदाईकडे कल
भारतात अनेक कंपन्यांच्या कार उपलब्ध आहेत. जीएसटी कमी झाल्यानंतर अनेकांनी याचा लाभ ग्राहकांना दिला आहे. याचा फायदा ह्युंदाई या कंपनीला मिळताना दिसून येत आहे.