घरात फक्त इतके ग्रॅमच सोनं आपण साठवून ठेवू शकता, सोने घरात ठेवण्याचे नियम जाणून घ्या

Published : Sep 23, 2025, 09:11 AM IST

भारत सरकारने घरात सोने ठेवण्याबाबत नियम निश्चित केले आहेत. यानुसार, विवाहित महिला ५०० ग्रॅम, अविवाहित महिला २५० ग्रॅम आणि पुरुष १०० ग्रॅम सोने वैध पुराव्याशिवाय ठेवू शकतात. वैध कागदपत्रे जसे की खरेदीची बिले असल्यास यापेक्षा जास्त सोने ठेवता येते.

PREV
16
घरात फक्त इतके ग्रॅमच सोनं आपण साठवून ठेवू शकता, सोने घरात ठेवण्याचे नियम जाणून घ्या

घरात आपण किती सोन साठवून ठेवू शकतो हे अनेकदा आपल्याला माहिती नसते. अशावेळी सरकारी नियम माहिती असायला हवेत, ते माहित असल्यास आपल्याला अचानक प्रसंगी अडचण निर्माण होत नाही.

26
सोने हे समृद्धीचे प्रतीक

भारतीय घरामध्ये सोने हे सुख आणि समृद्धीचे लक्षण समजले जाते. लग्न करताना सुरुवातीला किती सोनं देणार असा प्रश्न सुरुवातीला विचारला जातो. पण आपल्याला घरात किती सोनं ठेवलं जात हे आपल्याला माहित आहे का? भारत सरकारने घरात किती सोनं ठेवता येत याचे काही नियम ठरवून दिले आहेत, ते आपण जाणून घेऊयात.

36
घरात किती सोने ठेवता येईल?

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने घरात किती सोनं ठेवता येईल याबाबतचे नियम सांगितले आहेत. या नियमानुसार विवाहित महिलांना ५०० ग्रॅम, अविवाहित महिलांना २५० ग्रॅम आणि पुरुषांना १०० ग्रॅमपर्यंत सोनं जवळ ठेवता येणार आहे. सोने खरेदीचे वैध पुरावे नसताना हे नियम लागू होतात.

46
वैध कागदपत्रे असल्यास आपण जास्त सोने साठवून ठेवू शकता

आपल्याजवळ वैध कागदपत्रे असल्यास आपण जास्त सोने साठवून ठेवू शकता. यासाठी खरेदीचे बिल, पावती आणि इतर व्यवहाराचे स्पष्ट पुरावे ठेवणे आवश्यक आहे. आपल्याला प्रत्येक खरेदीवर एक बील मिळत असते, ते बिल जपून ठेवावे कारण सोने खरेदीचा तोच खरा पुरावा असतो.

56
GST आणि कारासंबंधीची माहिती

सोने खरेदी करताना त्यावर 3% वस्तू आणि सेवा कर (GST) लागतो, जो आपल्याला खरेदी करताना खर्चात समाविष्ट करावा लागतो. सोने खरेदी आणि विक्री करताना त्यावर किती कर लागू शकतो याबाबतची माहिती आपण सर्वात आधी जाणून घ्यायला हवी.

66
सोन्याच्या किंमतीत होणारे चढ आणि उतार

सोन्याच्या किंमतीमध्ये कायमच चढ उतार हे होत असतात. त्याचे भाव हे जागतिक बाजारपेठेतील स्थिती, स्थानिक मागणी, सणांचे महत्त्व आणि आर्थिक वातावरण. भारतात विशेषतः सणाच्या काळात सोन्याची मागणी वाढते, आणि यामुळे किमतींमध्ये चढ-उतार होतो. तसेच दिवाळी, दसरा आणि सणांच्या वेळेला सोनं मोठ्या प्रमाणावर खरेदी केलं जातं.

Read more Photos on

Recommended Stories