मुंबई: आजकाल बहुतेकजण ड्युअल सिम स्मार्टफोन वापरत असतात. यातील एक नंबर मुख्य वापरासाठी असतो, तर दुसरा केवळ कॉल रिसीव्ह करणे किंवा SMS साठी असतो. अशा वेळी त्या सेकंडरी सिमसाठी महागडे प्लॅन्स घेणे काहीसे अनावश्यक खर्चाचे कारण ठरू शकते.
याच गोष्टीचा विचार करून, Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) सारख्या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी अशा युजर्ससाठी परवडणारे आणि दीर्घकालीन प्लॅन्स सादर केले आहेत, जे तुमचे सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी योग्य आहेत.