Health Alert: काहीही काम न करता सतत थकवा का येतो? काय आहेत कारणे जाणून घ्या

Published : Jan 18, 2026, 02:36 PM IST

Health Alert: चांगली झोप आणि आरोग्य असूनही काही लोकांना सतत थकवा जाणवतो. कामात रस कमी होणे, दिवसभर अशक्त वाटणे अशी लक्षणे अनेकांमध्ये दिसतात. पण हे जास्त काळ टिकत असेल तर तज्ज्ञांच्या मते लगेच सावध व्हायला हवं. तज्ज्ञ असं का सांगतात जाणून घ्या कारणे 

PREV
14
ॲनिमिया हे एक प्रमुख कारण आहे

रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यास शरीराच्या अवयवांना आवश्यक ऑक्सिजन नीट पोहोचत नाही. यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे, धाप लागणे आणि सतत थकवा जाणवतो. ही समस्या महिलांमध्ये जास्त दिसून येते.

24
व्हिटॅमिन्स कमी झाल्यास ऊर्जाही कमी होते

व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन C, फोलेट यांसारखी पोषक तत्वे शरीरासाठी खूप आवश्यक आहेत. यांच्या कमतरतेमुळे स्नायूंचा अशक्तपणा, एकाग्रतेचा अभाव, चिडचिड आणि मानसिक गोंधळ दिसून येतो. अनेकजण याकडे सामान्य थकवा म्हणून दुर्लक्ष करतात.

34
मानसिक ताण हे देखील थकव्याचे कारण

सततचा ताण, चिंता आणि भावनिक ओझ्यामुळे मानसिक थकवा वाढतो. यामुळे शरीरातील ऊर्जा हळूहळू कमी होते. चिडचिड, कोणत्याही गोष्टीत रस नसणे आणि थकवा जाणवणे ही सामान्य लक्षणे आहेत.

44
कोणत्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे थकवा येतो?

तज्ज्ञांच्या मते, आयर्न, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D आणि मॅग्नेशियम शरीरात ऊर्जा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यांच्या कमतरतेमुळे सतत अशक्तपणा जाणवतो. जर ही लक्षणे बऱ्याच काळापासून असतील, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप: वर दिलेली माहिती केवळ प्राथमिक माहितीसाठी आहे. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणेच योग्य राहील.

Read more Photos on

Recommended Stories