MASLD Alert: चुकीच्या जीवनशैलीचा लिव्हरवर होतो वाईट परिणाम, सायलंट किलर असा ओळखा

Published : Jan 18, 2026, 02:28 PM IST

MASLD Alert: MASLD हा एक लिव्हर रोग असून सुरुवातीच्या टप्प्यात याची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. काहींना थकवा जाणवू शकतो, पोटात गॅस किंवा ॲसिडिटी होऊ शकते. पण आतून नुकसान होतच राहतं. याकडे दुर्लक्ष केल्यास ही लक्षणे लिव्हर कॅन्सरवर जाऊ शकतात.  

PREV
16
हा समज चुकीचा आहे

आपल्यापैकी अनेकांचा असा समज आहे की, फक्त औषधं आणि अल्कोहोलचं अतिसेवन करणाऱ्या लोकांचंच लिव्हर खराब होतं. पण हा समज चुकीचा आहे, असं प्रसिद्ध हेपॅटोलॉजिस्ट डॉ. सायरियाक ॲबी फिलिप्स सांगतात.

26
सर्वात सामान्य लिव्हरचा आजार

सोशल मीडियावर 'द लिव्हर डॉक' म्हणून ओळखले जाणारे डॉ. सायरियाक ॲबी फिलिप्स यांच्या मते, अल्कोहोलमुळे नाही, तर चुकीच्या जीवनशैलीमुळे MASLD (मेटाबॉलिक डिसफंक्शन असोसिएटेड स्टीटोटिक लिव्हर डिसीज) होतो. हा जगभरातील सर्वात सामान्य आणि दीर्घकाळ चालणारा लिव्हरचा आजार आहे.

36
कधीही दारूला स्पर्श न केलेले

हा आजार इतका गंभीर आहे की, सामान्य प्रौढांपैकी ३०-४०% आणि टाइप २ मधुमेह असलेल्यांपैकी ७०% लोकांना ही समस्या आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यापैकी अनेक लोकांनी कधीही दारूला स्पर्श केलेला नाही.

46
दारू न पिणाऱ्यांनाही हा आजार का होतो?

दिल्लीतील एका डॉक्टरच्या मते, आपल्या शरीरातील चयापचय क्रियेत अडथळा आल्यामुळे हे घडतं. जे भारतीय बारीक दिसतात, पण त्यांच्या पोटाच्या भागात चरबी जमा झालेली असते, त्यांच्यात हे जास्त प्रमाणात आढळतं. पांढरा तांदूळ, मैदा, कोल्ड्रिंक्स, मिठाई यांचं अतिसेवन आणि व्यायामाच्या अभावामुळे शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करत नाही. परिणामी, लिव्हर अतिरिक्त साखरेचं रूपांतर चरबीत करून ती साठवून ठेवतं. यामुळे अखेरीस लिव्हरला सूज येते.

56
सायलेंट किलर... कोणतीही लक्षणं नाहीत

सुरुवातीच्या टप्प्यात याची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. काहींना थकवा जाणवू शकतो, पोटात गॅस किंवा ॲसिडिटी होऊ शकते. पण आतून नुकसान होतच राहतं. दुर्लक्ष केल्यास, सिरोसिस (लिव्हर पूर्णपणे खराब होणे), लिव्हर फेल्युअर आणि लिव्हर कॅन्सर होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा आजार असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो.

66
यावर उपाय काय?

यावर उपाय म्हणजे जीवनशैलीत बदल. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर, मैदा टाळा. वजन कमी करा. आठवड्यातून 150 मिनिटे व्यायाम करा. दिवसातून 3 कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने धोका कमी होतो.

Read more Photos on

Recommended Stories