Government Jobs : उच्च न्यायालयात 260 रिक्त पदांवर नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रियेसह महत्त्वाच्या तारखा

High Court Recruitment 2024 : गुजरात हायकोर्टात रिक्त जागांवर नोकर भरती करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करावा लागणार आहे.

Gujarat High Court Recruitment 2024 : गुजरात हायकोर्टात स्टेनोग्राफर आणि अनुवादकच्या पदांवर नोकर भरती केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 मे 2024 आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय, स्टेनोग्राफर पदासाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर असावे.

नोकर भरतीमधील ग्रेड II साठी इंग्रजी शॉर्ट हँड स्पीड 120 प्रति मिनिट आणि ग्रेड III साठी 100 शब्द प्रति शॉर्ट हँड स्पीड असावी. गुजरात हायकोर्टात एकूण 260 पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये अनुवाद पदासाठी 16 आणि स्टेनोग्राफरच्या 244 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता :
अनुवादक पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि बेसिक कंप्युटर ज्ञान घेतलेल्याचे सर्टिफिकेट असावे. स्टेनोग्राफर पदासाठी कोणत्याही शाखेतून पदवीधरची डिग्री असावी. ग्रेड II साठी इंग्रजी शॉर्ट हँड स्पीड 120 शब्द प्रति मिनिट आणि ग्रेड III साठी 100 शब्द प्रति मिनिट असावी.

वयोमर्यादा
अधिसूचनेनुसार, अनुवादक पदासाठी कमीत कमी 18 ते 35 वर्षादरम्यान वय असावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट मिळणार आहे. स्टेनोग्राफर पदासाठी कमीतकमी वय 21 वर्ष ते 35 वर्ष असावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट मिळणार आहे.

वेतन किती?
स्टेनोग्राफर ग्रेड II साठी किमान वेतन 4,900 रुपये ते 1,42,400 रुपयांदरम्यान दिले जाईल. स्टेनोग्राफर ग्रेड III साठी वेतन 39,000 रुपये ते 1,26,600 रुपये असेल. अनुवाद पदासाठी वेतन 35,400 रुपये ते 1,12,400 रुपये असेल. अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

महत्त्वाच्या तारखा
-अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 6 मे, 2024
-अर्ज करण्याची अखेरची तारीख - 26 मे, 2024

असा करा अर्ज

आणखी वाचा : 

कोकण रेल्वेमध्ये मोठी भरती, पाहा अधिक माहिती

दुकानदार नाणी घेत नसेल तर चिंताग्रस्त होऊ नका, वाचा RBI चा नियम

Share this article