भारतातील टुरिस्टला श्रीलंकेत युनिफाइड पेंमेंट इंटरफेस (UPI) चा वापर करता येणार आहे. या ट्रांजेक्शनच्या माध्यमातून भारतीय चलनाचा वापर केला जाऊ शकतो. श्रीलंकेसह अन्य ठिकाणीही युपीआय प्रणालीचा वापर केला जात आहे.
Tech News : फिनटेक कंपनी फोनपे युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. श्रीलंकेतील युजर्सला युनिफाइड पेमेंट इंटरफेसचा वापर करुन पेमेंट करता येणार आहे. कंपनीने युपीआयच्या वापरासाठी श्रीलंकेत लंकापेसोबत पार्टनरशिप करणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे टुरिस्टला आपल्या सोबत रोख रक्कम वेळोवेळी ठेवण्याची चिंता दूर होणार आहे.
Phonepe ची एका कार्यक्रमात घोषणा कंपनीने एका कार्यक्रमावेळी श्रीलंकेत देखील फोनपे वापरता येणार असल्याची घोषणा करण्यात आली. लंकापे QR च्या माध्यमातून पेमेंटसाठी युपीआयचा वापर करता येऊ शकतो. याच्या माध्यमातून भारतीय चलनाचा वापरता येणार आहे.
व्यावसायिकांसह टुरिस्टला फायदा
फोनपेचे आंतरराष्ट्रीय सीईओ रितेश पई यांनी म्हटले की, श्रीलंकेत युपीआय प्रणालीमुळे भारतीय टुरिस्टला कॅशलेस ट्रांजेक्शनची सुविधा मिळणार आहे. सेंट्रल बँक ऑफ श्रीलंकाने गव्हर्नर नंदलाल वीरसिंघे यांनी म्हटले की, श्रीलंकेतील व्यापाऱ्यांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील. स्थानिक व्यावसायात वाढ होईल आणि यामुळे त्यांना लाभ होईल.
या देशातही युपीआय प्रणालीचा वापर
भारतातील युपीआय प्रणालीचा वापर अन्य देशांमध्येही केला जातो. यामध्ये नेपाळ, भूतान, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंकेचा समावेश आहे. ही सुविधा नागरिकांना मिळणार आहे. युएईमध्ये फोनपेची सुविधा सुरु झाल्यानंतर यासाठी बँक खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोडची गरज नसणार असल्याचे सांगण्यात आले होते.
आणखी वाचा :
दुकानदार नाणी घेत नसेल तर चिंताग्रस्त होऊ नका, वाचा RBI चा नियम
iPhone मधील फोटोज लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करण्यास येतेय समस्या? वाचा खास टिप्स