Apple User Alert : तुम्ही अॅप्पल डिवाइसचा वापर करत असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कंपनीने अॅप्पल युजर्ससाठी एक अॅलर्ट जारी केला आहे. अन्यथा तुम्ही संकटात पडण्याची शक्यता आहे.
Apple कंपनीने जगभरातील iPhone, iPad, Mac आणि Apple Watch युजर्ससाठी एक नवा अॅलर्ट जारी केला आहे. भारत सरकारने आपली सुरक्षा एजेंसीच्या माध्यमातून देशात अशा युजर्ससाठी अॅलर्ट जारी केला आहे जे अॅप्पल डिवाइसचा वापर करतात. भारतीय कंप्युटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम (CERT-In) कडून 20 मे ला जारी केलेल्या रिक्युरिटी बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची घोषणा केली आहे. खरंतर, अॅप्पल डिवाइसवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली होती. याशिवाय सॉफ्टवेअर अपडेट करण्यासही आवाहन करण्यात आले आहे.
सीईआरटी-इनच्या अॅलर्टमध्ये अशा गोष्टींवर अधिक भर देण्यात आला आहे जेथे आयफोन, आयपॅड, मॅकबुक, अॅप्पल वॉचसह अॅप्पल टीव्हीचा वापर करणाऱ्यांना नुकसान पोहोचू शकते.
Apple प्रोडक्ट्समध्ये काही त्रुटी
अॅप्पल प्रोडक्ट्समध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. अॅलर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, एक रिमोट अटॅकर सिस्टिममध्ये शिरकाव करण्यासाठी संवेदनशील माहिती मिळवतात. सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन आणि काही त्रुटींचा फायदा घेतात. अशातच पुढील काही अॅप्पल डिवाइस अपडेट करावेत.
वरील लिस्ट पाहिली असता त्यामधील वर्जनच्या सर्व प्रमुख अॅप्पल डिवाइस प्रभावित झाले आहेत. याशिवाय याच वर्जनवर लाखो डिवाइस चालवले देखील जातायत. iOS 17.5 लेटेस्ट वर्जन आहे. याचा अर्थ असा होतो की, यंदाच्या आठवड्याच्या सुरुवातीला अपडेट करणाऱ्या सर्व आयफोन युजर्सला संभाव्य हल्ल्यापासून सावध राहण्याची गरज आहे.
अॅप्पल डिवाइसवर कसे कराल सॉफ्टवेअर अपडेट?
कंपनीने नवीन उलब्ध करुन दिलेल्या वर्जनला इंस्टॉल करण्यासाठी फोनमध्ये General – Settings – About Update-Software Update येथे जावे. अशाप्रकारे नवे सॉफ्टवेअर अपडेट करता येईल.
आणखी वाचा :
प्रत्येक रेल्वे प्रवाशाच्या फोनमध्ये सेव्ह असावेत हे 4 महत्त्वाचे क्रमांक, लगेच होईल समस्येचे निवारण