Mumbai University PG Admission 2024 : पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासासाठी अर्ज प्रक्रिया सुरू, येथे पाहा महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक

Mumbai University PG Admission 2024 : मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

Chanda Mandavkar | Published : May 24, 2024 2:42 AM IST / Updated: May 24 2024, 08:14 AM IST

Mumbai University PG Admission 2024 Registration : मुंबई विद्यापीठीच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2024 च्या पदव्युत्तर शिक्षणासाठी रजिस्ट्रेशन लिंकही उपलब्ध करून दिली आहे. अशातच विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन फॉर्म भरावा लागणार आहे. यासाठी मुंबई महाविद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ muadmission.samarth.ac.in. येथे अर्ज करण्यासह अन्य महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळणार आहे.

अर्ज करण्याची अखेरची तारीख
मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्ज प्रक्रिया 22 मे पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख 15 जून 2024 आहे. या तारखेच्या कालावधीतच विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्ज करता येणार आहे. 15 जूनला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहे. यामुळे दिलेल्या मर्यादित कालावधीत विद्यार्थ्यांनी अर्ज भरावे अशी सूचनाही विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या तारखा

असा करा अर्ज

याशिवाय अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंकसाठी येथे क्लिक करा.

आणखी वाचा : 

प्रत्येक रेल्वे प्रवाशाच्या फोनमध्ये सेव्ह असावेत हे 4 महत्त्वाचे क्रमांक, लगेच होईल समस्येचे निवारण

पत्नी-मुलं ते आई-वडिलांना EPFO च्या माध्यमातून मिळतात या 7 पेन्शन सुविधा, असा घ्या लाभ

Share this article