Aadhar Card ला असे लावा बायोमॅट्रिक लॉक, फसवणूकीच्या घटनांपासून रहाल दूर

Aadhar Card भारतीय नागरिकाचे ओखळपत्र झाले आहे. पण अलीकडल्या काळात आधार कार्डच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्याची प्रकरणे वाढली जात आहेत. अशातच आधार कार्डला तुम्ही बायोमॅट्रिक लॉक लावू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.....

Aadhar Card Safety  Tips : भारतातील नागरिकाची ओखळ म्हणून आधार कार्डचा वापर केला जातो. या आधार कार्डवर 12 अंकी एक क्रमांक असतो, जो कधीच बदलला जात नाही. शाळेत प्रवेश घ्यायचा असो किंवा शासकीय कामांसाठी आधार कार्डचा वापर केला जातो. पण गेल्या काही काळापासून आधार कार्डच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार दिवसागणिक वाढताना दिसून येत आहेत. यामुळे आधार कार्डच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणूकीपासून दूर राहण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया सविस्तर....

आधार कार्डच्या माध्यमातून अशी केली जाते फसवणूक
आधार कार्डच्या नावाखाली तुम्हाला फसवणूकदार व्यक्ती बँकेचा अधिकारी अथवा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगून तुम्हाला फोन किंवा मेसेज करतो. मेसेजमध्ये असलेल्या अज्ञात लिंकच्या माध्यमातून तुमची फसवणूक होऊ शकते. याशिवाय ईमेलच्या माध्यमातूनही नागरिकांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. एवढेच नव्हे आधार कार्ड लिंक करण्याच्या नावाखालीही नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घालण्यात आल्याची प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे आधार कार्डसंदर्भातील माहिती एखाद्यासोबत शेअर करताना काळजी घ्यावी.

आधार कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीपासून असे राहा दूर

आधार कार्ड बायोमॅट्रिकला असे लावा लॉक
आधार कार्ड बायोमॅट्रिक लॉक नागरिकांना आर्थिक फसवणूकीपासून दूर ठेवू शकते. आधार कार्ड लॉक करण्यासाठी तुम्हाला वर्च्युअल आयडीची गरज भासणार आहे. पण तुमच्याकडे वर्च्युअल आयडी नसल्यास तुम्ही अधिकृत संकेतस्थळावरून तयार करू शकता. वर्च्युअल आयडी तयार केल्यानंतर आधार कार्डला लॉक लावण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

तुमच्या परवानगीशिवाय आधार कार्डचा वापर केला जातोय की नाही हे तुम्ही तपासून पाहू शकता. यासाठी पुढील काही स्टेप्स फॉलो करा.

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 : मतदान कार्ड हरवलेय? ऐन निवडणुकीवेळी असे करता येईल मतदान

Voter Education : घरबसल्या मतदान कार्डमध्ये असा बदला पत्ता आणि नाव, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

 

Share this article