WhatsApp भारतात बंद होणार? कोर्टात कंपनीने सांगितली ही मोठी बाब

WhatsApp : दिल्ली उच्च न्यायालयात मेटाने एका प्रकरणासंदर्भात धाव घेतली आहे. अन्यथा कंपनीला आपले भारतातील कामकाज बंद करावे लागेल असे व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे. जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण सविस्तर....

WhatsApp to Delhi HC :  व्हॉट्सअ‍ॅपने दिल्ली हायकोर्टाला म्हटलेय की, आम्हाला मेसेज एन्क्रिप्शन तोडण्यास भाग पाडल्यास मेसेंजिंग प्लॅटफॉर्म भारतात बंद होईल. खरंतर, एन्क्रिप्शनच्या (Encryption)  माध्यमातून युजर्सची सुरक्षितता राखली जाते. यावेळी केवळ मेसेज पाठवणारा व्यक्ती आणि वाचणारा व्यक्तीच मेसेज वाचण्यासह एक्सेस करू शकतो. मेटाचे मालकी हक्क असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप कंपनीच्या वकीलांनी कोर्टाला म्हटले की, एका मंचच्या रुपात आम्ही म्हणतोय जर आम्हाला एन्क्रिप्शन हटवण्यास सांगितल्यास व्हॉट्सअ‍ॅप भारतात बंद करावे लागेल.

आयटी कायद्याला मेटाचे आव्हान
व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकची मूळ कंपनी मेटाकडून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नियम 2021 ला आव्हान दिले जात आहे. यानुसार कंपनी चॅटला एक्सेस करू शकतात आणि मेसेजचा मूळही शोधून काढू शकतात. (WhatsApp Bhartat Banda Honar?)

व्हॉट्सअ‍ॅपने नक्की काय म्हटले?
टाइम्स ऑफ इंडियाने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने म्हटले की एंड-टू-एंड एन्क्रिप्शनच्या माध्यमातून युजर्सच्या प्रायव्हेसीची काळजी घेतली जाते. याच्या माध्यमातून हे सुनिश्चित केले जाते की, मेसेज पाठवणारा आणि वाचणारा युजर्सच त्यामधील कंटेट पाहू शकतो. कंपनीच्या वतीने कोर्टात तेजस कारिया उभे होते. त्यांनी कोर्टाला म्हटले की, एन्क्रिप्शन अ‍ॅपमधून काढून टाकल्यास व्हॉट्सअ‍ॅप बंद करावे लागेल.

करिया यांनी पुढे म्हटले की, प्रायव्हेसी फीचरमुळेच व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करता येतो. कंपनी आयटी नियम 2021 ला आव्हान देतेय. यामध्ये मेसेज ट्रेस करणे आणि मेसेज पाठवणऱ्याबद्दलची ओखळ होईल याबद्दल बोलतेय. याशिवाय कंपनीने म्हटले की, आयटी नियम 2021 मुळे एन्क्रिप्शनवर परिणाम होणार आहे. अशातच भारतीय युजर्सच्या प्रायव्हेसीचे उल्लंघन केले जाईल.

आणखी वाचा : 

Google Maps लवकरच लाँच होणार धमाकेदार फीचर, इंटरनेटशिवायही शेअर करता येणार लोकेशन

WhatsApp वरील जुने संवाद शोधणे कठीण झालेय? लवकरच येणारे हे फीचर

Share this article