वनडे टीमचा कॅप्टन शुभमन गिल सध्या विम्बल्डनमुळे चर्चेत आहे. सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबासोबत रॉयल बॉक्समध्ये मॅच बघताना तो दिसला. पण त्याचवेळी त्याच्यासोबत असलेल्या एका दुसऱ्या मुलीचा फोटो व्हायरल झालाय आणि ही मुलगी कोण आहे.
शुभमन गिल विम्बल्डनमध्ये त्याच्या काही मित्रांसोबतही होता. याचवेळी, सोशल मीडियावर त्याचा एक फोटो समोर आला, ज्यात एक 'मिस्ट्री गर्ल' त्याच्यासोबत उभी असलेली दिसली. मग ही मुलगी आहे तरी कोण?
25
गिलसोबत दिसलेली 'ती' हीच!
शुभमन गिलसोबत उभी असलेली ही मुलगी एक प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे. तिने आयपीएल, टी-20 वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप आणि टेनिस स्पर्धांसारखे अनेक मोठे इव्हेंट्स कव्हर केले आहेत. आयपीएलमध्ये ती गिलच्या टीमला सपोर्ट करतानाही दिसली होती.
35
या मुलीचं नाव आहे...
या मुलीचं नाव तन्वी शाह आहे. स्पोर्ट्स प्रेझेंटर बनण्यापूर्वी तन्वी एक प्रोफेशनल टेनिसपटू होती. ज्युनियर लेव्हलवर ती भारताची टॉप रँकिंग खेळाडू होती. इतकंच नाही, तर 16 वर्षांखालील गटात ती नंबर 1 होती. 2000 साली मेलबर्नमध्ये झालेल्या ज्युनियर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तन्वीने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
टेनिस सोडल्यानंतर तन्वीने काही काळ स्पोर्ट्स एजंट म्हणून काम केलं. त्यानंतर तिने स्पोर्ट्स प्रेझेंटिंगमध्ये करिअर केलं. तिने अबू धाबी टी10 लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग, आयपीएल, विम्बल्डन आणि आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये अँकरिंग केलं आहे.
55
म्हणून चर्चेत आहे तन्वी शाह!
तन्वी स्वतः एक माजी खेळाडू असल्याने तिला खेळाची टेक्निकल माहिती आहे. मैदानावरच्या प्रेशरचाही तिला चांगला अनुभव आहे. तिच्या लाईव्ह कॉमेंट्री आणि अँकरिंगमध्ये हे स्पष्टपणे दिसून येतं.